• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ज्याची भारताला प्रतिक्षा ती घोषणा झालीच, शी जिनपिंग भारतात पोहोचण्यापूर्वीच आली मोठी बातमी, तब्बल 6 वर्षांनी..

September 12, 2026 by admin Leave a Comment


चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग तब्बल सात वर्षांनी भारतात येत आहेत. काही वेळातच ते भारतात पोहोचतील. ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारतात येत आहे. गलवान घाटीनंतर भारत आणि चीनचे संबंध तणावात आली होती. आता पुन्हा संबंध चांगली होताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात व्दिपक्षीय चर्चा होईल. दोन्ही देशात संबंध सकारात्मक दिसत आहेत. विशेष म्हणजे तब्बल 6 वर्षानंतर नवी दिल्ली ग्वांगझोऊ विमान सेवा पुन्हा सुरू होतंय. चायनाच्या सदर्न एअरलाईन्सने म्हटले की, 21 सप्टेंबरपासून पुन्हा दोन्ही देशात विमानसेवा सुरू होईल. एअरलाईन्सने म्हटले की, 100 विमानांमार्फत सेवा पुन्हा सुरू होईल. नवी दिल्ली ते बीजिंग विमानसेवा एप्रिलमध्ये विमानसेवा सुरू झाली. यासोबतच 18 एप्रिलपासून कोलकाता आणि कुनमिंग विमान सेवा सुरू करण्यात आली.

गलवान घाटीमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या झडपेनंतर दोन्ही देशातील संबंध खराब झाली होती. त्यानंतर काही दिवसांपासून तणाव कमी झाला. आता शी जिनपिंग यांच्या भारत दाैऱ्याकडे सकारात्मक बघितले जातंय. चीनचे विदेश मंत्री आणि सीपीसी केंद्रीय समितीचे ब्यूरो सदस्य वांग यी देखील प्रतिनिधिनमंडळात सहभागी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शी जिनपिंग यांच्या प्रतिनिधीमंडळात जवळपास 400 सदस्य सहभागी होतील. शी जिनपिंग यांचा हा फक्त दाैरा नाही तर दोन्ही देशातील संबंधांची दिशा ठरणार आहे. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर भारताच्या मदतीला चीन आला. चीनने भारतासोबत तात्काळ काही मोठे करार केले. यासोबतच अमेरिकेविरोधात भूमिका घेतली.

भारत आणि अमेरिका संबंध तणावात आहेत. मात्र, भारताचा प्रतिस्पर्धी असलेला देश चीन भारतासोबत येत आहे. बांगलादेशने या परिषदेकडे पाठ फिरवली. आमच्या देशाच्या पंतप्रधानांना भारताकडून निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगताना बांगलादेश दिसला. तारिक रहमान यांना बैठकीचे आमंत्रण नव्हते, असे बांगलादेशने म्हटले. त्यातच शी जिनपिंग भारतात येत असल्याने मोठा धक्का बांगलादेशला बसला. फक्त बांगलादेशच नाही तर हा पाकिस्तानलाही मोठा धक्का म्हणावा लागेल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून…
  • Sunny Deol: वडिलांचा ‘तो’ सीन पाहून सनी देओलचा पारा चढलेला; थेट दिग्दर्शकालाच मारहाण
  • अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील, हळदी कुंकवावरुन मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
  • 10 वर्षांचं लग्न मोडलं, आता मुलीला एकटीने वाढवतेय अभिनेत्री; म्हणाली, मी विसरून जाते…
  • गोविदांचं 31 वर्षांपूर्वीचं गाणं, ऐकू येताच चाहते धरतात ठेका, आजही अनेकांचं आवडतं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in