• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जितेंद्र शेळकेंचा अपघात नसून घातपात, त्यांना मारलं गेलंय; गंभीर आरोपाने खळबळ

April 17, 2026 by admin Leave a Comment


संपूर्ण राज्यात सध्या भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण चर्चेत आहे. अशातच आज खरात याचा अत्यंत जवळचा सहकारी आणि शिवानिका ट्रस्टचे संचालक, उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी रस्त्यावरील धोत्रे गावाजवळ झालेल्या अपघातात जितेंद्र शेळके आणि त्याची पत्नी ठार झाली आहे. तर जखमी मुलाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर आता हा केवळ अपघात नसून घातपात तर नाही ना अशी शंका सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

जितेंद्र शेळकेंना मारलं गेलंय…

जितेंद्र शेळके यांच्या अपघातावर बोलताना तृप्ती देसाई यांनी म्हटले की, ‘शेळकेचं अपघाती निधन संशायस्पद आहे, साक्षीदार संपवण्याचा कट रचला जात आहे. 17 मार्चला खरात प्रकरणात गुन्हा दाखल झाला, आज बरोबर एक महिना पूर्ण होत आहे. उपाध्यक्ष म्हणून शेळके काम करत होते, शेळकेंना संपवण्याचा कट रचला गेलाय. या प्रकरणात अनेक साक्षीदार आहेत पोलिसांनी साक्षीदारांना संरक्षण द्यावं. जितेंद्र शेळकेंना मारलं गेलं आहे, या प्रकरणात अनेकांचा बळी जाऊ शकतो.’

अंजली दमानियांनी व्यक्त केली शंका

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले की, कंटनेरला हे जाऊन धडकले की कंटेनर रिव्हर्स मध्ये येऊन यांना धडकले? शेळकेंचा अपघात हा घात आहे. इतक्या लवकर अपघात घात का होत आहेत? जमिनीचा गैरव्यवहार हा दुसरा भाग आहे परंतु शिवनिकामध्ये काय चालायचे ते त्यांना माहिती होते. चौकशी चालू होती, शिवनिका संस्थानिका मध्ये त्यांचे पद हे खरातच्या पत्नीच्या वर होते. शिवनिका मध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे पदाधिकारी होते. या अपघातानंतर कंटेनरचे ड्रायव्हर आणि क्लिनर गायब का झाले आहेत? शेळके त्यांना धडकले आसतील तर हे दोघे का गायब झाले आहेत? या अपघातात शंका वाढत चालली आहे.

अपघात कसा झाला?

जितेंद्र शेळके यांच्या अपघाताबाबत माहिती देताना धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की, दुपारी 12.30 च्या दरम्यान अपघात झाला. गावातून फोन आले त्यानंतर आम्ही तातडीने इथे हजर झालो. महिला मोठ्या मोठ्याने ओरडत होती. कंटेनरमध्ये पाठीमागून गाडी घुसली होती. मुलगा आम्ही बाहेर काढलं आणि हॉस्पिटलला पाठवले. मुलाचा हात मोडलेला होता, क्रेन उशिरा आलं म्हणून महिलेचा मृत्यू झाला. महिला अडकली होती, त्यांचा पाय फक्त आम्हाला दिसत होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच
  • SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?
  • RCB vs DC Live Streaming : दिल्लीसमोर गतविजेत्या आरसीबीचं आव्हान, पराभवाची हॅट्रिक टाळणार?
  • GT vs KKR : कॅप्टन गिलचा तडाखा, गुजरातची विजयी हॅट्रिक, कोलकाताचा पाचवा पराभव
  • देशातील नारी शक्ती महिला-विरोधी पक्षांना कधीही माफ करणार नाही – धर्मेंद्र प्रधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in