• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग

September 10, 2026 by admin Leave a Comment


मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आता सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार विजयसिंह पंडित आणि राजेश विटेकर यांनी काल रात्री मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तब्बल अडीच तास चर्चा केली. या चर्चेत विविध मागण्यांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. विजयसिंह पंडितांनी सांगितले की, मराठा आरक्षणावर लवकरच मार्ग निघेल. मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीसोबत या संदर्भात चर्चा केली जाईल. त्यांनी मुंबईत आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे आश्वासनही दिले.

१२ तारखेला अंतरवाली सराटी येथे एक महत्त्वाची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाची पुढील दिशा आणि स्वरूप जाहीर केले जाईल. गेल्या दोन दिवसांपासून जरांगे पाटलांशी कोणतीही चर्चा झाली नव्हती, मात्र अजित पवार गटाच्या या आमदारांच्या भेटीने तोडगा निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सुटका नाहीच… अबू सालेमला मोठा झटका; काय घडलं सुप्रीम कोर्टात?
  • Rohit Pawar: नाना पटोलेंशी गुप्त भेट, रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? भाजपच्या या बड्या नेत्याचा दावा, मग पवारांचं उत्तर काय?
  • संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण समोर
  • Prasad Oak: प्रसाद ओक म्हणजे ‘धर्मवीर आनंद दिघे’! फडणवीसांच्या कौतुकानंतर अभिनेता नतमस्तक
  • मुंबईतील टॉप कॉलेजच्या हॉस्टेलची दुरावस्था! खोल्या प्रचंड अस्वच्छ, इमारती चिंताजनक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in