• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गालावर खळी आणि वेड लावणारं हास्य… एवढी सुंदर दिसते पण स्वत:चा चित्रपट कधीच पहात नाही ही अभिनेत्री, असं का ?

September 12, 2026 by admin Leave a Comment


बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू त्याच्या आगामी ‘व्हाइब’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. यामध्ये अभिनेत्री प्रीती झिंटाचीही (Priety Zinta) महत्वाची भूमिका आहे. तीन दशकांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत असलेल्या प्रीतीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. प्रीतीच खळी आणि तिचं सौंदर्य, त्यासोबतच अभिनय यामुळे तिचे लाखो चाहते आहेत. कित्येक जण तिचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहतात. पण बॉलिवूडच्या या ‘डिंपल गर्ल’ला मात्र तिचे स्वत:चे चित्रपट पहायला बिलकूल आवडत नाही, खुद्द प्रीतीनेच हा खुलासा केलाय. मात्र त्यामागचं कारणही तिने स्पष्ट केलं. खरंतर ‘व्हाइब’ चित्रपटात प्रीती झिंटा ही ‘मॅडम एच’ या सुपर स्पायच्या भूमिकेत दिसणार आहे. ती कुणाल खेमू आणि स्पर्श श्रीवास्तव, या दोन सामान्य मुलांसाठी एक सीक्रेट मिशन निवडते. या चित्रपटात प्रीती काही जबरदस्त ॲक्न सीन्स करतानाही दिसणार आहे. फिल्ममधील स्टंट सीन्सबद्दलही ती मोकळेपणाने बोलली.

काय म्हणाली प्रीती ?

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती दरम्यान प्रीती म्हणाली, “ सेटवर ॲक्शन करणं हे नेहमीच एका प्रकारच्या तडजोडीसारखं असतं. जिन्यांवरून पडण्याचा सीन असो किंवा इतर कोणतेही स्टंट, मला ते स्वतः करायचे असायचे. पण त्यात तांत्रिक बाबी खूप असतात, त्यामुळे काळजीपूर्वक काम करावं लागतं. तसेही, बॉडी डबल किंवा स्टंट करणाऱ्या व्यक्तींचे कामच हे आहे. आपण त्यांचा रोजगार तर हिरावून घेऊ शकत नाही. पण आमच्या संपूर्ण ॲक्शन टीमला सलाम आहे. पडद्यावर जे काही दिसतं, ते त्यांच्या मेहनतीचंच फळ आहे; आम्ही तर फक्त समोर उभे असलेले चेहरे आहोत.” असं ती म्हणाली.

स्वत:चे चित्रपट का पहात नाही प्रीती झिंटा ?

कॅमेऱ्यासमोर अनेक वर्षं काम करूनही स्वतःचा चित्रपट पडद्यावर पाहणं हे आजही प्रीती झिंटासाठी सहज नाही. स्वतःला स्क्रीनवर पाहिल्यानंतर तिचं लक्ष तिच्या अभिनयातील चुका किंवा उणिवांकडे जातं आणि मनात सतत एकच विचार येतो—हे दृश्य आणखी चांगल्या पद्धतीने करता आलं असतं. याबाबत प्रीतीने सांगितलं, की “मला माझे स्वतःचे चित्रपट पाहणं अजिबात आवडत नाही. चित्रपटाचे काम पूर्ण झाल्यानंतर मी तो पुन्हा पाहण्याचं टाळते. विशेषतः थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर स्वतःला पाहणे हे माझ्यासाठी खूपच अस्वस्थ करणारं असतं. चित्रपट पाहण्याची इच्छा नसतं असं नाही, मात्र स्वतःकडे पाहणं मला जमत नाही. कारण चित्रपट सुरू असताना माझ्या मनात सतत हेच विचार सुरू असतात की, “या सीनमध्ये मी आणखी चांगलं काम करू शकले असते.” असं प्रीतीने नमूद केलं.

कधी रिलीज होणार व्हाईब ?

व्हाईब चित्रपटात अनेक कलाकार दिसणार आहेत. त्यामध्ये निरहुआ आणि यशपाल शर्मा प्रमुख भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या देखील एका खास कॅमिओ भूमिकेत झळकतील.ॲक्शन आणि सस्पेन्सने भरलेला हा चित्रपट येत्या 18 तारखेला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मास्टर-ब्लास्टरला टाकलं मागे! जो रूटने मोडला सचिनचा ऐतिहासिक विक्रम
  • आयटी इंजिनिअर व्यायामात मग्न, भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू, पुण्यात धक्कादायक घटना!
  • Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
  • Weather Update : मोठी गुड न्यूज, राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
  • India vs Afghanistan T20 : वैभव घरेलू मैदान गाजवणार त्याआधीच आली वाईट बातमी, चाहत्यांची निराशा होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in