• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गर्ल्स हॉस्टेलमध्ये नको ते घडलं ! बाथरूममध्ये लपवलेली अशी वस्तू ज्यामुळे… मुली फक्त रडायच्याच राहिल्या; असं काय घडलं?

September 10, 2026 by admin Leave a Comment


Gorakhpur News : उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि प्रायव्हसीचा भंग करणारा एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कँट ठाणे क्षेत्रातील मोहद्दीपुर येथील एका प्रायव्हेट गर्ल्स हॉस्टेलच्या बाथरूममध्ये कॅमेरा सुरू असलेला मोबाईल फोन आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली. हॉस्टेलच्या महिला वॉर्डनने बाथरूममध्ये हा मोबाईल लपवून ठेवला होता आणि त्याचा कॅमेरा सुरू होता, असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. हॉस्टेलमधील विद्यार्थिनी फ्रेश होताना, स्नान करताना त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मोबाईल ताब्यात घेतला. महिला वॉर्डनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गोरखपूरमधील कॅन्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहद्दीपूर परिसरातील आहे. या हॉस्टेलमध्ये शहरातील विविध महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सुमारे 26 विद्यार्थिनी राहतात. हॉस्टेलमध्ये एकूण 20 खोल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच हॉस्टेलमध्ये राहायला आलेली एक नवीन विद्यार्थिनी 8 सप्टेंबर रोजी फ्रेश होण्यासाठी कॉमन बाथरूममध्ये गेली होती. त्यावेळी तिची नजर अचानक बाथरूममध्ये लपवून ठेवलेल्या एका अँड्रॉइड मोबाईल फोनवर पडली. त्या मोबाईलचा कॅमेरा सुरू होता आणि तो थेट टॉयलेटकडे वळवण्यात आला होता. सतर्क विद्यार्थिनीने तातडीने आपल्या मोबाईलमधून लपवून ठेवलेल्या त्या फोनचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर तिने बाहेर येऊन हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनींना या प्रकाराची माहिती दिली.

डायल 112 वर दिली माहिती

बाथरूममध्ये कॅमेरा लावलेला मोबाईल आढळल्याची माहिती पसरताच हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी जोरदार गोंधळ घालत तातडीने आपल्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. काही विद्यार्थिनींनी संपूर्ण घटनाक्रम आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांनी डायल 112 वर पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीआरव्ही आणि कॅन्ट पोलीस ठाण्याचे पथक रात्री सुमारे 12 वाजता हॉस्टेलमध्ये पोहोचलं. पोलिसांनी विद्यार्थिनी तसेच महिला वॉर्डनची चौकशी केली. चौकशीदरम्यान बाथरूममध्ये सापडलेला मोबाईल वॉर्डनचा असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितलं. तपासणीदरम्यान मोबाईलमध्ये अनेक विद्यार्थिनी आंघोळ करताना आणि फ्रेश होत असतानाचे कथित व्हिडिओ आढळल्याचे सांगण्यात आले. कोणताही आक्षेपार्ह कंटेंट लीक होऊ नये, यासाठी पोलिसांच्या उपस्थितीत हे व्हिडिओ डिलीट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यार्थिनींनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे बुधवारी सायंकाळी आरोपी वॉर्डनविरोधात कॅन्ट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र या प्रकारामुळे प्रचंड खळबळ माजली असून विद्यार्थिनींची प्रायव्हसी आणि त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IMD Weather Update : बंगालच्या खाडीत काय घडतंय? विदर्भाला अलर्ट, महाराष्ट्रात पाऊस कधी?
  • Mumbai Crime : 5 रुपयांची जुनी नोट, 51 लाखांचे स्वप्न अन् लाखोंचा गंडा; रीलने मुंबईकराला लुटलं !
  • Nagpur Orange Loss | संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ; 20-25 दिवसांपासून पाऊस गायब, शेतकरी संकटात
  • Donald Trump | नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान; हाऊस-सिनेटवर कोणाचं वर्चस्व?
  • मनोज जरांगेंचा मुंबईत येण्याचा इशारा, उदय सामंत यांचं मोठं विधान, म्हणाले 12 तारखेच्या आधीच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in