
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने राज्यभरात कठोर पाऊले उचलली आहेत. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील FDA पथकांनी पुणे आणि डोंबिवली येथे मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील बुधवार पेठेतून ४ ट्रक खोवा आणि पनीरचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. हे खाद्यपदार्थ परराज्यातून आणल्याचा संशय असून, त्यांच्या दर्जा आणि स्त्रोताबाबत तपासणी सुरू आहे.
याचबरोबर, डोंबिवली पश्चिमेकडील भोईरवाडा परिसरात FDAने धाड टाकून ५०० लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट केले. हे दूध सांगलीहून आले होते आणि कल्याण-डोंबिवलीमधील अनेक डेअरी व विक्रेत्यांना पुरवले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित विक्रेत्याकडे दूध विक्रीचा कोणताही परवाना नव्हता. जप्त केलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. FDAच्या या धडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Leave a Reply