• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

क्रिकेटर्स, बॉलिवूड अभिनेत्री अन् सट्टेबाजी; अमित मजीठियाने खोलली दुबईच्या पार्ट्यांची गुपिते!

September 12, 2026 by admin Leave a Comment


क्रिकेट विश्लेषक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अमित मजीठिया याने पॉडकास्टमध्ये बॉलिवूड पार्ट्या, क्रिकेटर्स आणि मॅच फिक्सिंगच्या अंतर्गत जगाबाबत अनेक धक्कादायक दावे आणि खुलासे केले आहेत. अमित मजीठिया याने एजाज खानच्या पॉडकास्टमध्ये आपल्यावरील आरोपांवर थेट भाष्य केलं. एजाजने आपल्या पॉडकास्टमध्ये अमित मजीठियाला विचारलं की, बॉलिवूडशी तुमचं जवळचं नातं आहे आणि मुलींसोबत तुमचं नाव जोडंल जातं. इतकंच काय तर तुमच्या आसपास काय कोणती ना कोणती बॉलिवूड नटी असते. तुम्ही त्यांना महागड्या वस्तू गिफ्ट वगैरे देता असंही म्हंटलं जातं. यावर तुमचं म्हणणं काय आहे? या प्रश्नावर अमित मजीठिया याने सांगितलं की, ‘माझे बॉलिवूडशी चांगले संबंध आहे. पण मी कोणालाही महागड्या भेटवस्तू दिलेल्या नाहीत.’ माझ्या किंवा मित्रांच्या वाढदिवसाला अनेक अभिनेत्री येत असत. जर एखादी सेलिब्रिटी कार्यक्रमासाठी आली की नंतर भेट होते.

अमित मजीठिया इतक्यावरच थांबला नाही, त्याने या पॉडकास्टमध्ये काही खुलासेही केले. त्याने सांगितलं की, ‘बॉलिवूड अभिनेत्री माझ्या घरी बुरखा घालून बसतात. मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, किंवा जे काही असेल, मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला माहीत आहे.’ तुमचं एखाद्या अभिनेत्रीसोबत प्रेमप्रकरण वगैरे होतं का? त्यावर अमित मजीठियाने स्पष्टपणे नकार दिला. पण अनेकांसोबत मैत्री आहे. अमित मजीठिया म्हणाला की, जेव्हा एखादा बॉलिवूड सेलिब्रिटी भेटायला येतो आणि दुसऱ्या दिवशी मोकळा असतो, तेव्हा ते माझ्या गाडीबद्दल विचारतात. मी पर्यटन क्षेत्रातही काम करतो, त्यामुळे अनेक सेलिब्रिटी येतात आणि माझी गाडी घेऊन जातात, आणि अशा प्रकारेही माझे संबंध निर्माण होतात.

एजाजने पॉडकास्टमध्ये त्याला मॅच फिक्सिंगबाबतही प्रश्न विचारला. कधी मॅच फिक्सिंग केलं आहे का? किंवा सामन्याचा निकाल बदलण्याचा प्रयत्न वगैरे केला आहे का? या प्रश्नावर अमित मजीठिया म्हणाला की, मी कधीही मॅच फिक्सिंग केलं नाही किंवा कोणत्याही क्रिकेटपटूशी संपर्क साधलेला नाही. ते माझ्या नियमात बसत नाही. तसं मी कधीच केलं नाही. माझा तसा हेतू असता तर मी ते सहज करू शकलो असतो. माझे अनेक क्रिकेटपटू मित्र आहेत. माझ्या क्लबमध्ये हुक्का प्यायला यायचे. पण त्यांचा आग्रह असायची की क्लब दोन तासांसाठी बंद ठेवावा आणि कोणीही आत येऊ नये. पण त्यांना तसं करण्यास नकार दिला. एका सेलिब्रिटी किंवा क्रिकेटपटूसाठी आपल्या नियमित ग्राहकांना दूर ठेवायचे नव्हते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Majithia (@amit_majithia)

अमित मजीठिया दुबईला का गेला?

अमित मजीठियावर भारतात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यामुळे तो दुबईत फरार झाले आहेत. ऑनलाइन सट्टेबाजीत कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहारांमुळे तपास यंत्रणा त्याच्या शोधात आहेत. अमित मजीठिया याने दुबईला जाण्याचं कारण सांगताना म्हणाला की, ‘जेव्हा मी दुबईला गेलो, तेव्हा नोटाबंदीचा दुसरा दिवस होता. त्यावेळी भारतात ऑनलाइन बेटिंगचा जन्मही झाला नव्हता, कारण मीच त्याची निर्मिती केली. जेव्हा नोटाबंदी झाली, तेव्हा मी विश्लेषक नव्हतो, मी एक टिपर होतो.’





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जिनपिंग यांची रहस्यमयी कार काळ्या कव्हरने का झाकली? चीनला नेमकं काय लपवायचंय?
  • Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
  • क्रिकेटर्स, बॉलिवूड अभिनेत्री अन् सट्टेबाजी; अमित मजीठियाने खोलली दुबईच्या पार्ट्यांची गुपिते!
  • क्रिकेटर्स, बॉलिवूड अभिनेत्री अन् सट्टेबाजी; अमित मजीठियाने खोलली दुबईच्या पार्ट्यांची गुपिते!
  • अन् ती गोष्ट घडताच महिलांना गावाबाहेर हाकलून देतात… असं काय घडतं ? अजब प्रथेने…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in