
अनाक क्राकाटाऊ ज्वालामुखीत काही दिवसांपूर्वीच भीषण उद्रेक झाल्याची घटना घडली होती. उद्रेकानंतरही अनाक क्राकाटाऊ ज्वालामुखीमधून अजूनही स्फोट होत असून लाव्हा आणि तप्त राख बाहेर पडत आहे. त्यामुळे साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामुळे या घटनेची इत्यंभूत माहिती पोहोचावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असं असताना या सक्रिय ज्वालामुखीच्या उद्रेकाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेली एक स्पीडबोट सुंडा सामुद्रधुनीत बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर 5 पत्रकारांसह एकूण 8 लोक होते. बोटीमध्ये इंडोनेशियाच्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांचे 5 पत्रकार होते. त्यांच्यासोबत चालक दलाचे 2 सदस्य आणि 1 स्थानिक गाइड असे एकूण 8 जण होते.
7 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी बंतन प्रांतातील कारिता किनारपट्टीवरून हे सर्वजण बोटीने निघाले होते. पण संध्याकाळनंतर त्यांचा मुख्य कार्यालयाशी किंवा बोटीच्या मालकाशी कोणताही संपर्क झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नेमकं काय झालं यासाठी तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. इंडोनेशियाची राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्था, स्थानिक पोलीस, लष्कर आणि मच्छिमार थर्मल ड्रोन आणि हाय-स्पीड बोटींच्या मदतीने त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, ज्वालामुखीमधून निघणारी राख, समुद्रातील उंच लाटा आणि कमी दृश्यमानता यामुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत आहेत.
Mount Anak Krakatau erupts in Indonesia, disrupting air travel as volcanic ash spreads across region
Eruption sends ash into airspace around Sumatra and Java
Seven airports temporarily closed, including Jakarta’s Soekarno-Hatta International Airport
Around 2,300… pic.twitter.com/XHsv36Ez7X
— Anadolu English (@anadoluagency) September 7, 2026
एका पत्रकाराने सोमवार संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपल्या नातेवाईकांना मेसेज करून ज्वालामुखीच्या जवळ पोहोचल्याचे सांगितले होते. तेव्हा ते किनाऱ्यापासून साधारण 18.5 किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर संपर्क त्यांचा तुटला. दरम्यान, या घटनेमुळे जकार्तासह अनेक शहरांवर राखेचे साम्राज्य पसरले असून अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहे. इतकंच काय तर ज्वालामुखीच्या 3 किमी परिसरात जाण्यास बंदी घातली होती.
Eruption sends ash into airspace around Sumatra and Java
Seven airports temporarily closed, including Jakarta’s Soekarno-Hatta International Airport
Around 2,300…
Leave a Reply