
जळगावमध्ये राजकीय वर्तुळात एक मजेदार प्रसंग घडला. राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात वयावरून शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळाली. हा दिलखुलास संवाद उपस्थितांमध्ये हास्याचे वातावरण निर्माण करणारा ठरला. या प्रसंगाची सुरुवात गुलाबराव पाटील यांनी केली. त्यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख ज्येष्ठ वयोवृद्ध मंत्री असा केला. गुलाबराव पाटील यांच्या या टिप्पणीनंतर, गिरीश महाजन यांनी तात्काळ आणि त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत प्रत्युत्तर दिले. महाजन म्हणाले, “ज्येष्ठ वयोवृद्ध मंत्री मी नाही म्हणत. नामदार गिरीशभाऊ महाजन.
आता कुठं बी गेले सगळे, सगळ्यात म्हणतात, पोलीस पाटील आहेत. कोण जेष्ठ वाटतं तुम्हाला? गुलाबराव वाटतो का मी? हसून दाखवा. लहान बंधू आणि भगिनींनो. तुम्ही लहान वाटता माझ्यापेक्षा.” महाजन पुढे असेही म्हणाले की, “गुलाबभाऊ, तुम्ही कितीही प्रयत्न करा तरुण व्हायचा, दाखवायचा, पण ते काही जमणार नाही.” दोन नेत्यांमधील हा दिलखुलास संवाद राजकीय कार्यक्रमात एक हलकेफुलके क्षण घेऊन आला आणि उपस्थितांचे मनोरंजन झाले.
Leave a Reply