• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऑफर करणाऱ्या डायरेक्टरसोबत मी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे, पण अभिनेत्रीने ठेवली एकच अट

September 11, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री खुशी मुखर्जी तिच्या बोल्ड अंदाजासोबतच बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखली जाते. इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करताना तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागला. नुकतंच एका पॉडकास्टमध्ये तिने कास्टिंग काउचसारख्या गंभीर मुद्द्यावर मोकळेपणाने भाष्य केलं. (All Photos : Instagram)

खुशीने सांगितलं की, इंडस्ट्रीमध्ये काही कास्टिंग डायरेक्टर्स कलाकारांकडून कामाच्या बदल्यात चुकीच्या आणि अनैतिक मागण्या करतात. अशा लोकांना इंडस्ट्रीतून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, असंही तिने स्पष्टपणे सुनावलं.

आपल्या अनुभवाबद्दल बोलताना खुशी म्हणाली की, मलाही अनेकदा भूमिकेच्या बदल्यात कॉम्प्रोमाइज करण्याच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. मात्र, अशा ऑफर्सना मी स्पष्टपणे नकार देते आणि समोरच्याला चोख उत्तर सुनावते.

“मी त्यांना म्हणते, जर तुम्हाला माझ्यासोबत झोपायचं असेल, तर एक डमी व्यक्ती आणा. माझी फोटोकॉपी काढा आणि तिच्या चेहऱ्यावर माझा चेहरा लावा. मग समजा की ती खुशी आहे.” असं खुशीने सांगितलं.

काही कास्टिंग डायरेक्टर्सच्या वागण्यावर संताप व्यक्त करताना ती म्हणाली, इंडस्ट्रीमध्ये असे काही लोक आहेत, जे कलाकारांकडून कॉम्प्रोमाइजची अपेक्षा करतात आणि ती जणू काही सामान्य गोष्ट आहे असंच समजतात.

त्यांच्या अशा मागण्या ऐकून मला आश्चर्य वाटतं. एखादी मुलगी ही फिरती वस्तू आहे का, की तिच्याकडून कुठेही आणि कोणासोबतही कॉम्प्रोमाइज करून घेतलं जाईल?” असा थेट सवाल खुशीने विचारला. .

अशा कास्टिंग डायरेक्टर्सना तिने चांगलंच सुनावलं. खुशीच्या मते काही लोकांना इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धी मिळाल्यानंतर आपल्या पदाचा गैरवापर करण्याची सवय लागते आणि ते कलाकारांना कमी लेखू लागतात. कामाच्या बदल्यात कलाकारांकडे शारीरिक संबंधांची मागणी करणे हे पूर्णपणे चुकीचे आणि अनैतिक असल्याचं स्पष्ट मत खुशीने मांडलं. कोणत्याही कलाकाराला अशा प्रकारे दबावाखाली आणणं किंवा त्याचा गैरफायदा घेणे योग्य नाही, असंही ती ठामपणे म्हणाली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Elena Rybakina : टेनिस कोर्ट गाजवलं, सौंदर्यातही कमाल; कझाकिस्तानच्या ‘क्वीन’ची जगभर चर्चा
  • BRICS Summit : भारताचा अमेरिकेला मोठा धक्का, ब्रिक्स परिषदेमधील हा फोटो पाहिलात का? ट्रम्प यांचा होणार जळफळाट
  • गणेशोत्सवात दारू विक्रीवर बंदी… कोर्ट संतापले; न्यायाधीश म्हणाले, अशाने तर 10 दिवस…
  • Putin Car : मोदी यांचा पुतीन यांच्या कारमधून पुन्हा प्रवास, पुतीन यांची कार म्हणजे फिरता अभेद्य किल्ला, काय वैशिष्ट्ये ?
  • पुतिन भारतात येताच युरोपने टाकला मोठा डाव, रशियाला दिला खतरनाक झटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in