• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एफडीए परीक्षा पेपर फुटीचं प्रकरण, संभाजी ब्रिगेडने एमपीएससीच्या सचीवांना काळं फासलं, आदिती तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया…

September 11, 2026 by admin Leave a Comment


एमपीएससी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या एफडीएच्या परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे राज्यात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. विद्यार्थ्यांकडून या विरोधात मोठं आंदोलन उभारण्यात आलं असून, एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. हे सर्व सुरू असतानाच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईत एमपीएससीचे सचीव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलं आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असल्याचं पहायला मिळत आहे. आता मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या पेपर फुटीच्या घटना घडू नये, म्हणून कडक पाऊलं उचलण्याची गरज आहे, यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे, मुलांच्या भवीतव्याचा प्रश्न आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?

जी काही एमपीएससीची पेपरफुटी असेल किंवा  या विद्यार्थ्यांना होणारा हा त्रास असेल त्याचं समर्थन कोणी करणार नाही, जरी तो सरकारमध्ये असो किंवा कोणीही असो याचं समर्थन होऊ शकत नाही. सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांचे पालक आहेत ते अतिशय कष्टाने खऱ्या अर्थाने परिश्रम करून या परीक्षेची तयारी करत असतात, त्यामुळे अशा घटना घडल्या नाही पाहिजेत. या पेपर फुटीच्या घटना घडू नये, म्हणून कडक पाऊलं उचलण्याची गरज आहे, यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे, मुलांच्या भवीतव्याचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री देखील या पार्श्वभूमीवर कठोर भूमिका घेत आहेत, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवार यांना आरोपी का केलं नाही? असा सवाल काही दिवसांपूर्वी न्यायालयाकडून पोलिसांना करण्यात आला होता, यावर देखील यावेळी तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ दादा पवार हे आमचे खासदार आहेत. चुकीच्या गोष्टींचं कुठेही कोणीही समर्थन करणार नाही. त्यावेळी आदरणीय दादा असतील आता सुनेत्रा काकी असतील कोणीही समर्थन करणार नाही. जी काही चौकशी यंत्रणा आहे, ते त्यांचं काम करेल, त्यातून खरं खोटं काय ते समोर येईल, या प्रकरणावर अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असंही यावेळी आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी नमस्कार करत असतो – देवेंद्र फडणवीस
  • 80s रेट्रो ट्रेंड झाला जुना, आता AI ने फोटोला राजस्थानी शाही घराण्याचा लुक्स द्या, या 5 Prompts मदतीने तुमचे रुप बदला…
  • Modi-Putin Meet 2026 : पंतप्रधान मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना 2000 वर्षापूर्वीच पुस्तक गिफ्ट केलं, त्यात काय खास आहे?
  • Elena Rybakina : टेनिस कोर्ट गाजवलं, सौंदर्यातही कमाल; कझाकिस्तानच्या ‘क्वीन’ची जगभर चर्चा
  • BRICS Summit : भारताचा अमेरिकेला मोठा धक्का, ब्रिक्स परिषदेमधील हा फोटो पाहिलात का? ट्रम्प यांचा होणार जळफळाट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in