
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार, ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्ससारख्या मोठ्या स्पर्धा तसेच औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “हे केंद्र सरकार फक्त गुजरातचे आहे की देशाचे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रपती भवनही गुजरातला हलवण्याची वेळ आली असल्याचा टोला त्यांनी लगावला. ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील आयटी विभागातील १२ हजार कोटींच्या कथित घोटाळ्याकडे लक्ष वेधले.
अँटीव्हायरसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. MPSC विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि आंदोलनांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली, सरकार यावर गंभीर नसल्याचे त्यांनी म्हटले. भाजपकडून राहुल गांधींना मिया राहुल गांधी संबोधण्यावर टीका करत, भाजप जेव्हा अडचणीत येते तेव्हा हिंदू-मुस्लिम कार्ड वापरते असे त्यांनी स्पष्ट केले. धर्माच्या नावावर विभाजन करण्याचे राजकारण भाजप करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.
Leave a Reply