
ठाणे महानगरपालिकेत शिंदेसेनेला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक पाच अ मधील शिंदेसेनेच्या नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. त्यांचे आदिवासी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. बिनविरोध निवडून आलेल्या सुलेखा चव्हाण यांचे पद संपुष्टात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुलेखा चव्हाण यांच्या अनुसूचित जाती जमातीच्या प्रमाणपत्रासंदर्भात तक्रारी होत्या.
या तक्रारींच्या आधारावर चौकशीअंती त्यांचे आदिवासी प्रमाणपत्र रद्द ठरले. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद त्वरित रिक्त झाले. या घटनेमुळे ठाण्यातील शिंदेसेनेच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सुलेखा चव्हाण यांच्याप्रमाणेच शिंदेसेनेच्या आणखी नऊ नगरसेवकांवर देखील अशाच कारवाईची टांगती तलवार कायम आहे. त्यांच्या प्रमाणपत्रांबाबतही चौकशी सुरू असून, याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात तक्रारी केल्या होत्या. भविष्यात या नऊ नगरसेवकांबद्दल काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply