
अभिनेत्री अश्विनी महांगडे सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. दहीहंडी 2026 निमित्त अश्विनीने तिचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोमधील पारंपरिक लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंमध्ये अश्विनीने हिरव्या रंगाची डिझायनर नऊवारी साडी नेसली असून त्यावर लाल रंगाचा आकर्षक ब्लाऊज परिधान केला आहे.
नऊवारी साडीला साजेसा पारंपरिक दागिन्यांचा साज करत तिने आपला लूक पूर्ण केला आहे. नथ, पारंपरिक दागिने आणि कपाळावरील कुंकू यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
अश्विनीने या खास लूकचे फोटो शेअर करताना स्वाभिमान आणि पारंपरिक संस्कृतीचा अभिमान व्यक्त करणारे कॅप्शन लिहिलं आहे.
अश्विनीच्या या पारंपरिक अंदाजावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. तिच्या फोटोंवर कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होत असून, अनेकांनी तिच्या नऊवारी लूकचं आणि पारंपरिक अंदाजाचं कौतुक केलं आहे.




Leave a Reply