• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अतितटीच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर कर्णधार तिलक वर्माने मांडला लेखाजोखा, म्हणाला…

June 9, 2026 by admin Leave a Comment

भारत अ आणि श्रीलंका अ संघ तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 50 षटकात 6 गडी गमवून 277 धावा केल्या आणि विजयासाठी 278 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने चांगली सुरूवात केली. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून जाईल असंच वाटलं होतं. पण एक चमत्कार घडावा तसा हा सामना फिरला. श्रीलंकेच्या तोंडात असलेला विजयाचा घास भारताने हिरावून घेतला. या सामन्यातील 48 आणि 49 व्या षटकात श्रीलंकेने 4 विकेट गमावल्या. त्यामुळे भारताला विजय मिळाला. श्रीलंकेला 18 चेंडूत 17 धावा करता आल्या नाहीत. अवघ्या 8 धावांवर चार विकेट गमावल्या आणि भारताने हा सामना जिंकला. या विजयानंतर भारताचा कर्णधार तिलक वर्माने या सामन्याचा लेखाजोखा मांडला.

सामना भारताच्या बाजूने कधी झुकला? याबाबत भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा म्हणाला की, ‘साहन ज्या प्रकारे फलंदाजी करत होता ती खूपच चांगली होती, मला वाटतं की जेव्हा अंशुलने तो यॉर्कर टाकला आणि साहन बाद झाला, ती एक महत्त्वाची विकेट होती आणि तिथेच सामन्याला कलाटणी मिळाली. विशेषतः आमचे सलामीचे गोलंदाज अर्शद आणि कंबोज यांनी पहिल्या स्पेलमध्ये फारशी चांगली गोलंदाजी केली नसली तरी, ज्या प्रकारे त्यांनी सामना संपवला ते पाहणे जबरदस्त होते.’

तिलक वर्मा खेळपट्टीबाबत स्पष्टपणे म्हणाला की, ‘खेळपट्टी फारशी बदललेली नाही. आम्हाला वाटलं होतं की दुसऱ्या डावात ती आणखी संथ होईल, पण खरं सांगायचं तर, खेळपट्टी फारशी बदललेली नाही. पण जसं मी नाणेफेकीच्या वेळी म्हणालो, 270 धावा चांगल्या होत्या, पण मला वाटतं की आम्ही आता नव्याने विचार करू आणि चांगल्या ठिकाणी गोलंदाजी कशी करायची हे पाहू आणि पुढच्या सामन्यात पुनरागमन करू.’

तिलक वर्मा पुढे म्हणाला की, श्रीलंकेत श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या खूप चांगल्या संघांविरुद्ध खेळताना आव्हान असेल. तुम्ही पाहिले तर, आम्ही श्रीलंकेविरुद्ध खेळलेली शेवटची मालिका त्यांनी जिंकली होती. पण आम्हाला माहित आहे की ही स्पर्धा किती चुरशीची असेल आणि आम्ही त्यासाठी तयारी केली आहे, आणि मला आनंद आहे की पहिला सामना आमच्या बाजूने आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in