• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अखेर ज्याची भीती तेच घडलं, रशियाकडून धाडधाड हल्ले; त्या छोट्या देशावर क्षणात…युद्धाने भरली धडकी!

August 1, 2026 by admin Leave a Comment


एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आहे. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धदेखील संपलेले नाही. सध्या अमेरिका-इराण एकमेकांवर मोठे हल्ले करत असल्याने जागतिक पुरवठा साखळी पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भविष्यात हा संघर्ष वाढला तर कच्च्या इंधनाचा भाव पुन्हा एकदा वाढू शकतो. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री हा हल्ला झाला असून युक्रेनची राजधानी कीव येथेच वेगवेगळ्या भागात हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये 9 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसा रशियाने शनिवारी मध्यरात्री युक्रेनची राजधानी कीववर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. या भीषण हल्ल्यात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला असून 22 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. युक्रेनच्या आपत्कालीन विभागाने तशी माहिती दिली आहे. या हल्ल्यांमुळे राजधानीतील अनेक निवासी आणि व्यावसायिक भागांचे मोठे नुकसान झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

अडकलेल्या 35 नागरिकांची सुरक्षित सुटका

कीवमधील सोलोमियांस्की परिसरात क्षेपणास्त्रांचे अवशेष एका पाच मजली निवासी इमारतीवर कोसळले. त्यामुळे त्या भागात मोठी आग लागली. अग्निशमन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत इमारतीच्या वरच्या मजल्यांवर अडकलेल्या 35 नागरिकांची सुरक्षित सुटका केली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. दोन लहान मुलांसह आठ जण जखमी झाले आहेत.

वाहने, प्रशासकीय कार्यालयांचे नुकसान

दुसरीकडे, डार्नित्स्की भागातही मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले. अनेक घरे, वाहने, प्रशासकीय कार्यालये आणि इतर इमारतींचे नुकसान झाले. या भागात सात जणांचा मृत्यू झाला. तर 14 नागरिक जखमी झाले आहेत. शहरातील इतर काही भागांमध्येही निवासी आणि व्यावसायिक इमारतींचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

З ночі у Києві та області тривають роботи з ліквідації наслідків російського удару. Багато пожеж було в місті – сім районів постраждали. І, як зазвичай, росіяни вдарили по звичайних житлових будинках. Пошкоджено 18 будинків, школа, посольство Литви та об’єкти інфраструктури.… pic.twitter.com/AfzhN73y1H

— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) August 1, 2026

झेलेन्स्की यांनी केले मित्रदेशांना आवाहन

दरम्यान, रशियाने पुन्हा एकदा हल्ले सुरू केल्यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी देशाच्या हवाई संरक्षणासाठी अमेरिकेसह पाश्चात्त्य मित्रदेशांना मदतीचे आवाहन केले आहे. आम्हाला क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली उपलब्ध करून द्यावी, असं ते म्हणाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या युक्रेनच्या आवाहनाला नेमका कसा प्रतिसाद देणार, हे पाहेणे महत्त्वाचे ठरणार आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in