
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. आज 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी आहे. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक राजकीय पक्षांनी म्हणाव्या तश्या सभा या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घेतल्या नाहीत. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. नक्की जनतेने कोणाला मतदान करून विजयी केले हे अगदी काही वेळातच स्पष्ट होईल. हळूहळू करून निकालाचे अपडेट आपल्या हाती येतील. महापालिका निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाबद्दलचे प्रत्येक अपडेट आपल्याला इथे tv9 मराठीवर बघायला मिळतील. मतमोजणी केंद्रावर कुठलाही गोंधळ होऊ नये, म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली. 12 जिल्हा परिषज आणि 125 पंचायत समितीचे निकाल लागणार आहेत.
Leave a Reply