• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ZP Elections Results: खासदार, आमदार, माजी आमदारांच्या नातेवाईकाचं काय झालं? पहा एका क्लिकवर

February 9, 2026 by admin Leave a Comment


आज राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात भाजप आणि महायुतीने शानदार विजय मिळवला आहे. 12 पैकी 11 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या निवडणुकीत खासदार, आमदार, माजी आमदार यांचे नातेवाईक मैदानात उतरले होते. यातील काही उमेदवारांचा विजय झाला आहे, तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नेत्यांच्या नातेवाईकांचं काय झालं? 

  • पुणे जिल्हा परिषदेच्या बावडा गटातून ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांनी शानदार विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या अंजली घोगरे यांचा पराभव केला.
  • सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे आ गोपीचद पडळकरांच्या वाहिनी माधवी पडळकर मैदानात होत्या. त्यांनी शिंदे शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांचा पराभव केला.
  • शिवसेनेचे नेते तानाजी सावतांचे पुतणे पृथ्वीराज सावंत मानेगाव,माठा येथून भाजपकडून मैदानात उतरले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुहास पाटील यांचा पराभव केला.
  • आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिणी खोत वागणी वाळवा येथून मैदानात होत्या, त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उर्मिला घनवट यांचा पराभव केला.
  • मंत्री दतात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे इदापूर पंचायत समितीच्या मैदानात उतरला होते, त्यांनी भाजपच्या सचिन धापटे यांचा पराभव केला.
  • आमदार शेखर निकम यांच्या पत्नी पूजा शेखर निकम या राष्ट्रवादीकडून सावर्डे, चिपळूण येथून मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी शिवसेनेच्या धनश्री शिंदे यांचा पराभव केला.
  • माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी सस्कृती सातपुते भाजपकडून दहिगाव, माळशिरसमधून मैदानात उतरल्या होत्या, त्यांनी राष्ट्रवादीच्या जीवन जानकर यांचा पराभव केला.
  • आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव आमेर अभई, सिल्लोड येथून मैदानात उतरले होते. त्यांनी भाजपच्या त्र्यंबक गव्हाणे यांचा पराभव केला.
  • खासदार संदिपान भुमरे यांते पुतने शिवराज भुमरे आडूळ, पैठण येथून शिवसेनेकडून मैदानात उतरले होते, त्यांनी राष्ट्रवादीच्या विलास शेळके यांचा पराभव केला.
  • माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पत्नी पूनमताई राजपूत नागद, सिल्लोडमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात होत्या, त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकलाबाई राठोड यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
  • भाजपचे आमदार बबनराव लोणीकर याच्या कन्या मीनाक्षी पवार भाजपकडून हातनूर, सिल्लोड येथून मैदानात उतरल्या होत्या, त्यांनी राष्ट्रवादीच्या कौशल्याबाई पवार यांचा पराभव केला.
  • भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील तेरमधून सक्षणा सलगर यांच्या विरोधात मैदानात उतरल्या होत्या, त्यांनी शानदार विजय मिळवला आहे.
  • माजी आमदार संजय वाघचौरेच्या पत्नी सुनिता वाघचौरे ढोरकीन, पैठणमधून राष्ट्रवादीकडून मैदानात उतरल्या होत्या, त्यांचा शिवसेनेच्या राधिका जगताप यांनी पराभव केला.
  • माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरुपा थोपटे भाजपकडून उत्रौली कारळभोर येथून मैदानात उतरल्या होत्या, त्यांनी राष्ट्रवादीच्या रणजित शिवतारे यांचा पराभव केला.
  • खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलतबंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील फोडशिरस, माळसिरसमधून मैदानात उतरले होते, त्यांनी भाजपच्या हरिदास वाघमोडे यांचा पराभव केला.
  • आमदार अनुराधा चव्हाण यांचा पुतण्या निखिल चव्हाण मैदानात भाजपकडून गणोरी, फुलंब्री येथून मैदानात उतरला होता, त्याने काँग्रेसच्या संदीप बोरसे यांचा पराभाव केला.
  • सांगोल्यात माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांचे पुत्र यशराज साळुंखे जवळा, सांगोला येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, त्यांनी राष्ट्रवादीच्या अतुल पवार यांचा पराभव केला.
  • माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या कोमल ढोबळे या लक्ष्मी दहिवडी येथून शरद पवार गटाकडून मैदानात उतरल्या होत्या, त्यांना भाजपच्या करुणा शिवसरण यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
  • मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील निवडणूक लढवत होते. भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांनी त्यांचा पराभव केला आहे
  • माजी आमदार मानसिंग नाईक यांचे पुत्र विराज नाईक मैदानात मागले, शिराळा येथून राष्ट्रवादीच्या तिकीटावर मैदानात उतरले होते. त्यांनी भाजपच्या विजय पाटील यांचा पराभव केला.
  • आमदार विश्वजीत कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड हे कुंडल,पलूस कडेगाव येथून काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात होते. त्यांनी भाजपच्या धनश्री लाड यांचा पराभव केला.
  • खानापूर तालुक्यात नागेवाडी गटात आमदार सुहास बाबर यांची भावजय शीतल अमोल बाबर या शिवेसनेकडून मैदानात उतरल्या होत्या, त्यांनी भाजपच्या सुजाता माने यांचा पराभव केला.
  • आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची पत्नी शांभवी कल्याणशेट्टी चपळगाव, अक्कलकोट येथून भाजपकडून मैदानात उतरल्या होत्या, त्यांनी शिवसेनेच्या अंजली भरमशेट्टी यांचा पराभव केला.
  • माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्या सुनबाई प्रेरणा समशेर वरपूडकर या देठणा, परभणी येथून भाजपकडून मैदानात उतरल्या होत्या, काँग्रेसच्या ज्योत्सना घाडगे यांनी त्यांचा पराभव केला.
  • माजी आमदार सुरेश वरपूडकर यांची मुलगी सोनल देशमुख वरपूडकर या झरी, परभणी येथून ठाकरे गटाकडून मैदानात उतरल्या होत्या, भाजपच्या दिलीपराव देशमुख यांनी त्यांचा पराभव केला.
  • माजी आमदार सुरेश वरपूडकर यांचा मुलगा समशेर वरपूडकर हे सिगणापुर, परभणी येथून भाजपकडून मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीच्या एकनाथ साळवे यांनी त्यांचा पराभव केला.
  • माजी आमदार सुरेश वरपूडकर यांचा मुलगा समशेर वरपूडकर हे सिगणापुर, परभणी येथून भाजपकडून मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीच्या एकनाथ साळवे यांनी त्यांचा पराभव केला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अजितदादांच्या राष्ट्रवादीने गड राखला, पुणे जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
  • GK : महात्मा गांधीजींचा नोटांवरील फोटो हटवता येऊ शकतो का? वाचा कायद्यात तरतूद काय!
  • Zilla Parishad Election Result 2026: माजी सरपंच, रिल्स स्टार निर्मला नवले हरल्या की जिंकल्या ?
  • जबरदस्तीने अधिग्रहित केलेल्या जमिनीची भरपाई पूर्णपणे करमुक्त? जाणून घ्या
  • Gold Rate : सोन्याचा जबर दणका, एकाच दिवसात सर्वात मोठी वाढ, 10 ग्रॅमचा भाव थेट…सामान्यांची चिंता वाढली!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in