• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ZIM vs SA Live Streaming : दक्षिण आफ्रिका विजयी हॅट्रिकसाठी सज्ज, झिंबाब्वे जाता जाता उलटफेर करणार?

February 28, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील आपल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेवर 5 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने यासह सुपर 8 मोहिमेचा शेवट विजयाने केला. मात्र पाकिस्तान नेट रनरेटच्या हिशोबाने सामना जिंकण्यात अपयशी ठरली. सेमी फायनलच्या 1 जागेसाठी पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये चुरस होती. पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकायचा होता. मात्र पाकिस्तान यात अपयशी ठरली. त्यामुळे पाकिस्तानला 5 धावांनी विजयी होऊनही सेमी फायनलमध्ये पोहचता आलं नाही. त्यामुळे न्यूझीलंडने सेमी फायनलचं तिकीट मिळवलं.

दक्षिण आफ्रिका की झिंबाब्वे? कोण जिंकणार?

आता सुपर 8 फेरीत रविवारी शेवटचे 2 सामने होणार आहेत. रविवारी डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिंब्बावे आमनेसामने असणार आहेत. दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. तर झिंबाब्वेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना औपचारिकता आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचा हा सामना जिंकून सुपर 8 मध्ये विजयी हॅट्रिक करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला झिंबाब्वे जाता जाता दक्षिण आफ्रिकेला उलटफेरचा शिकार करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

झिंबाब्वेने सुपर 8 फेरीतील 2 सामने गमावलेत. झिंबाब्वेने त्याआधी साखळी फेरीत 4 पैकी 3 सामने जिंकलेत. झिंबाब्वेने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे झिंबाब्वेने दक्षिण आफ्रिकेलाही जाता जाता झटका देते का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. या निमित्ताने दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिंबाब्वे यांच्यातील सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

झिंबाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कधी?

झिंबाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना रविवारी 1 मार्चला होणार आहे.

झिंबाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कुठे?

झिंबाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.

झिंबाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

झिंबाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

झिंबाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

झिंबाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर हा सामना मोबाईलवर जियोहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सोनाक्षी सिन्हा हिच्या प्रेग्नंसीवर आईचे मोठे विधान, थेट म्हटले, कितीतरी वेळा मी आजी..
  • IPL 2026: लाईव्ह सामन्यात झाली मोठी चूक, हैदराबादने जिंकलेला सामना लखनौच्या पारड्यात पडला! Video
  • पूजेसाठी नारळ आणि केळीच का वापरतात? लहानपणापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर सापडलं
  • महाराष्ट्राची मुलगी, विषाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून 3000 सापांचे प्राण वाचवणारी अभिनेत्री
  • Gold Price Today : सकाळी सकाळी नको तेच घडलं ! सर्वसामान्यांना सोन्याचा मोठा धक्का, अवघ्या काही तासांत सोन्याची किंमत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in