• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Yuzvendra Chahal : भारताला फक्त एकच संघ हरवू शकतो… युजवेंद्र चहल ‘ते’ नाव सांगितलंच

February 6, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा अनुभवा खेळाडू, स्पिनर युजवेंद्र चहल हा आंतराराष्ट्रीय क्रिकेटपासून बऱ्याच काळापासून दूर आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 मधील संघात तर चहल होता, पण त्या स्पर्धेत त्याला एकाही सामन्यात खेलम्याची काही संधी मिळाली नाही. ऑगस्ट 2023 मध्ये तो वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र त्यानंतर तो फक्त आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांतच दिसला. गेला काही काळ तर तो खेामुळे किवा परफॉर्मन्समुळे नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमपुळेच प्रचंड चर्चेत होता.

युजवेंद्र चहल हा नुकताच एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हजर होता. त्या वेळी त्याने त्याच्या करिअरशी संबंधित अनेक गुपितं सांगितलं. एवढंच नव्हे तर चहलने सोशल मीडिया ट्रोलिंग पासून ते रिटायरमेंट प्लान, टी20 वर्ल्ड कप मध्ये भारताची ताकद , टीम कॉम्बिनेशन आणि तरूण खेळाडूंची भूमिका या सर्वांवर त्याचं मत माडलं.

ट्रोलिंगमुळे फरक पडत नाही

35 वर्षांच्या युजवेंद्र चहलने त्याच्यावर होणारी टीका,ट्रोलिंग यावर प्रतिक्रिया दिली. मला ट्रोलिंगमुळे जास्त फरक पडत नाही असं तो स्पष्टच म्हणाला. पण लोकं जेव्हा दुसऱ्या कोणाचं नाव जोडून काही खासगी गोष्टी सांगतात, तर्क वितर्क करतात तेव्हा वाईट नक्कीच वाटतं असं चहलने सांगितल. पण या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्यात, त्यांना महत्व देण्यात अर्थ नाही. क्रिकेटवरच फोकस केला पाहिजे, असंही त्याने सांगितलं.

रिटायर कधी होणार, काय म्हणाल चहल ?

चहलच्या निवृत्तीबद्दल, रिटायरमेंटबद्दलही अनेक अफवा उडत असतात. त्याबद्दलही त्याने सांगितलं. मी अजून 5-6 वर्ष तरी खेळू इच्छितो, असं चहलने स्पष्ट केलं. जोपर्यंत मला मैदानावर खेळण्यात आनंद मिळतोय, जोष आहेत, तोपर्यंत मी क्रिकेट खेळत राहीन, असं त्याने सांगितलं. याचदरम्यान चहलने आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 बाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले.

भारताला फक्त एकच संघ हरवू शकतो…

भारताला फक्त एकच संघ हरवू शकतो, तो म्हणजे स्वत: भारत, इतर कोणत्याही संघात भारतला हरवण्याची क्षमता नाही, असं चहलने सांगितलं. या संघात अनुभव आणि तरुणाईचा उत्साह यांचा उत्तम समतोल आहे. चहलने जसप्रीत बुमराहचे जगातील नंबर 1 गोलंदाज आणि हार्दिक पंड्याचे, संघाचा सर्वात महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून वर्णन केले. तर तिलक वर्मा आणइ अभिषेक श्रमा हे आक्रमक विचारसरणीते खेळाडू आहेत, जे संघाला नवी उर्जा देतात, असंही तो म्हणाला.

कोहली-रोहित बद्दल काय म्हणाला चहल ?

प्रत्येक खेळाडूचा वेळ येते आणि जाते, असा त्याचा विश्वास आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही, भारतीय टी-20 संघ उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे कारण हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवसारखे अनुभवी खेळाडू संघाचे नेतृत्व करत आहेत असंही चहल म्हणाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, खासगी सचिवांची…
  • अजित डोभाल यांच्या अमेरिका गुप्त दाैऱ्याबद्दल हैराण करणारी माहिती, भारताने स्पष्ट…
  • मर्सिडीज-ऑडीवरून थेट टॅक्सीवर, गोविंदा दिवाळखोरीत? घर गहाण, पैशांसाठी शाळांमध्ये करतोय डान्स
  • Pariksha Pe Charcha 2026: परीक्षा पे चर्चा; डिजिटल फास्टिंग ते घोकंपट्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विद्यार्थ्यांना 5 कानमंत्र
  • ‘क्रांतिज्योति विद्यालय’च्या यशानंतर हेमंत ढोमेची मोठी घोषणा; तुम्हीही व्हाल खुश!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in