• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

W,W,W..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात हॅटट्रीक, शेफर्डने केली कमाल Video

February 7, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा स्कॉटलँडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमवून 20 षटकात 182 धावा केल्या. तसेच विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना स्कॉटलँडची सुरुवात काही चांगली झाली नाही. पावर प्लेमध्ये 37 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर चौथ्या विकेटसाठी टॉम ब्रूस आणि बेरिंग्टन यांनी 78 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पुन्हा गाडी रूळावरून घसरली. 115 धावा असताना चौथी विकेट आणि 122 धावांवर पाचवी विकेट पडली. तसं पाहिलं तर हा सामना स्कॉटलँडच्या हातून गेला होता. त्यात रोमारियो शेफर्डने 17व्या षटकात कहर केला. त्याने या षटकात एकूण 4 विकेट काढल्या. तसेच हॅटट्रीकची नोंद केली. या स्पर्धेतील पहिली हॅटट्रीक ठरली.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत स्कॉटलँड विरूद्ध रोमारियो शेफर्डच्या 17 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मॅथ्यू क्रॉस बाद झाला. 11 धावांवर असताना सदरफर्डने त्याचा झेल पकडला. त्यानंतर फलंदाजांची रांग लागली. मायकल लीक्स आला तसाच तंबूत गेला. शेफर्डच्या गोलंदाजीवर रोवमॅन पॉवेलने त्याचा झेल घेतला. त्यानंतर हॅटट्रीक बॉलचा सामना करण्यासाठी ओलिवर डेविडसन मैदानात उतरला. पण शेफर्डने त्याचा त्रिफळा उडवला आणि स्पर्धेतील पहिल्या हॅटट्रीकची नोंद केली. त्यानंतर त्याला डबल हॅटट्रीकची संधी होती. पण सफयान शरिफने त्याचा एक चेंडू खेळला आणि संधी हुकली. पण त्याच्या पुढच्या चेंडूवरच त्याची विकेट पडली. रोमारियाने या षटकात एकूण 4 विकेट घेतल्या. रोमारियाने 3 षटकात 20 धावा देत 5 विकेट घेतल्या. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट 6.70 चा होता.

Romario Shepherd snaps the first hat-trick of #T20WorldCup 2026 🔥

Follow his exploits at the tournament LIVE, broadcast details 📺 https://t.co/rVKMv03p6T pic.twitter.com/xuGiWDSrXP

— ICC (@ICC) February 7, 2026

Hat Trick for Romario Shepard pic.twitter.com/DdEMo0wUMb

— Yogesh (@yogesharma92) February 7, 2026

वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना स्कॉटलँडचा संघ 147 धावा करू शकला. स्कॉटलँडचा संघ 18.5 षटकात 147 धावांवर गारद झाला. वेस्ट इंडिजने हा सामना 35 धावांनी जिंकून स्पर्धेत सकारात्मक सुरूवात केली आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs USA : यूएसए विरुद्ध टीम इंडियाला मोठा झटका, जसप्रीत बुमराह पहिल्याच सामन्यातून आऊट, संजूला डच्चू
  • देशात चार प्रकारचे हिंदू, भारताचा सनातन स्वभाव कधीच…मोहन भागवत यांचे महत्त्वाचे भाष्य!
  • ‘नवी नॅशनल क्रश’, गिरिजा ओकनंतर या अभिनेत्रीच्या साडी आणि सौंदर्याने लावलं सर्वांना वेड, फोटो…
  • संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान, भाऊ कदम, प्रसाद ओक यांची हजेरी; काय म्हणाले?
  • डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय ? त्याचा नेमका कसा फायदा होतो?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in