• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WPL 2026 Final Toss : आरसीबीने फायनलमध्ये टॉस जिंकला, दिल्ली विरुद्ध निर्णय काय?

February 5, 2026 by admin Leave a Comment

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन स्मृती मंधाना हीने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध टॉस जिंकला. स्मृतीने जेमिमाह रॉड्रिग्स विरूद्धच्या संघाविरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेत दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. उभयसंघातील सामना हा वडोदऱ्यातील बीसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांनी या महाअंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

आरसीबीसमोर शफाली वर्माला रोखण्याचं आव्हान

आरसीबीच्या गोलंदाजांसमोर या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सची ओपनर शफाली वर्मा अर्थात लेडी सेहवाग हीला रोखण्याचं आव्हान असणार आहे. शफाली वर्मा हीने आतापर्यंत या मोसमातील 9 सामन्यांमधील 9 डावांत 123.20 च्या स्ट्राईक रेटने आणि 26.56 च्या सरासरीने एकूण 239 धावा केल्या आहेत. तसेच शफालीने या दरम्यान 36 चौकार आणि 4 षटकार लगावले आहेत. अशात आता शफालीकडून दिल्ली कॅपिट्ल्सला तडाखेदार खेळीची अपेक्षा असणार आहे. आता शफाली चाहत्यांच्या विश्वासावर किती खरी उतरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिल्ली-आरसीबीची चौथ्या मोसमातील तिसरी लढत

दिल्ली कॅपिट्ल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची अंतिम सामन्यानिमित्ताने या चौथ्या मोसमात आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी झालेल्या 2 सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. विशेष म्हणजे दिल्लीनेच आरसीबीचा विजयरथ रोखला होता. दिल्लीने सलग 5 सामने जिंकणाऱ्या आरसीबीला सहाव्या सामन्यात पराभूत करत विजयरथ रोखला होता.

दिल्ली पहिली ट्रॉफी जिंकणार?

दरम्यान दिल्लीची अंतिम फेरीत पोहचण्याची ही सलग चौथी तर आरसीबीची दुसरी वेळ ठरलीय. आरसीबीने 2024 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ट्रॉफी जिंकली होती. तर दिल्लीला तिन्ही वेळा अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागलं होतं. अशात आता दिल्ली 2024 मधील पराभवाची वसूली करत पहिली ट्रॉफी जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन : लिझेल ली (विकेटकीपर), शफाली वर्मा, लॉरा वॉल्डवॉर्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (कर्णधार), मारिजान काप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी आणि नंदनी शर्मा.

आरसीबी प्लेइंग ईलेव्हन : ग्रेस हॅरिस, स्मृती मंधाना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, ऋचा घोष (विकेटकीपर), राधा यादव, नादिन डी क्लार्क, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, सायली सातघरे, श्रेयंका पाटील आणि लॉरेन बेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?
  • Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
  • IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर
  • मुंबईकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी सावधान, मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक
  • 747 कोटींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण OTT वर सुपरहिट, नंबर 1, काय आहे स्टोरी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in