• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WPL 2026 Final : कॅप्टन स्मृतीच्या निशाण्यावर 3 विक्रम, दिल्ली विरुद्ध हॅट्रिक करण्याची संधी, यशस्वी होणार?

February 5, 2026 by admin Leave a Comment

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील अंतिम सामन्याच्या थराराला गुरुवारी 5 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. डब्ल्यूपीएलच्या ट्रॉफीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. दिल्लीने जेमिमाह रॉड्रिग्स हीच्या नेतृत्वात पहिल्यांदा आणि एकूण सलग चौथ्यांदा स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत धडक दिलीय. तर आरसीबीची अंतिम फेरीत पोहचण्याची ही दुसरी वेळ आहे. आरसीबीने 2024 साली पहिल्याच प्रयत्नात डब्ल्यूपीएल ट्रॉफी उंचावली होती. तर दिल्लीला गेल्या सलग 3 मोसमात अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागलंय. अशात जेमिमाह कॅप्टन म्हणून दिल्लीची प्रतिक्षा संपवणार की स्मृती मंधाना त्याच्या नेतृत्वात आरसीबीला दुसरी ट्रॉफी मिळवून देणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

स्मृतीला विक्रमी कामगिरीची संधी

स्मृतीला अंतिम सामन्यानिमित्ताने या स्पर्धेत आणि चौथ्या मोसमात खास कामगिरी करण्याची संधी आहे. स्मृतीने अशी कामगिरी केल्यास चौथ्या मोसमात ती नंबर 1 फलंदाज ठरेल. स्मृतीला चौथ्या हंगामात मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीला मागे टाकून सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे. सोबतच स्मृतीला या स्पर्धेत 1 हजार धावा करणारी पाचवी तर आरसीबीची पहिला महिला फलंदाज हा बहुमान मिळवण्याची संधी आहे. स्मृतीला यासाठी किती धावांची गरज आहे? हे जाणून घेऊयात.

स्मृतीला किती धावांची गरज?

स्मृती मंधाना हीला चौथ्या मोसमात हरमनप्रीत कौर हीचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी 53 धावांची गरज आहे. स्मृती सध्या चौथ्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. स्मृतीने 8 सामन्यांत 290 धावा केल्या आहेत. तर हरमनप्रीत कौर हीने 8 सामन्यांत 342 रन्स केल्या आहेत.

तसेच स्मृतीने अंतिम सामन्यात एकूण 64 धावा केल्यास खास विक्रमाची नोंद तिच्या नावावर होईल. स्मृती डब्ल्यूपीएल स्पर्धेत 1 हजार धावा करणारी एकूण पाचवी तर आरसीबीची पहिली महिला फलंदाज ठरेल. स्मृतीने आतापर्यंत 4 हंगामात 34 सामन्यांमध्ये 936 धावा केल्या आहेत.

हरमनप्रीतच्या विक्रमाची बरोबरी करणार?

दरम्यान हरमनप्रीत तिच्या नेतृत्वात एकाच संघाला 2 ट्रॉफी जिंकून देणारी एकमेव कर्णधार आहे. तर स्मृतीने आरसीबीला एकदा चॅम्पियन केलंय. आता स्मृतीने आरसीबीला जिंकवल्यास ती आपल्या संघाला 2 ट्रॉफी मिळवून देणारी स्पर्धेतील दुसरी कर्णधार ठरेल. स्मृती अशाप्रकारे हरमनप्रीतच्या विक्रमाचीही बरोबरी साधेल. अशात स्मृती महाअंतिम सामन्यात 3 पैकी किती विक्रम करण्यात यशस्वी ठरते? हे निकालानंतर स्पष्ट होईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आईना देख लिया तो… मोदींनी राज्यसभा गाजवली, शायराना अंदाजात काँग्रेस, आप पक्षाला घेरलं!
  • मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, आता लोकल उशिरा धावणार नाही, प्रवाशांना मोठा दिलासा, काय आहे नवा प्लॅन?
  • या तारखांना जन्मलेले लोक असतात अतिशय क्रूर, पत्नीचं आयुष्य बनवतात नरक
  • पाऊस पडूनही राज्याच्या अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई, पुणे, बुलढाण्यात पाण्यासाठी महिलांचे हंडे मोर्चे
  • मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी, 32 वर्षांपूर्वी मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर ऐश्वर्या रायचं सौंदर्य…Video व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in