
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत केलं. आरसीबी यासह चॅम्पियन्स ठरली. आरसीबीची ट्रॉफी जिंकण्याची ही या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी वेळ ठरली. आरसीबीने 204 धावांचं विजयी आव्हान हे 2 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आरसीबीच्या विजयात कॅप्टन स्मृती मंधाना हीने सर्वाधिक योगदान दिलं. स्मृतीने सर्वाधिक 87 धावा केल्या. स्मृतीने यासह खास कामगिरी केली. स्मृतीने मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीला पछाडत चौथ्या मोसमात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. तसेच स्मृतीने हरमनप्रीतच्या कॅप्टन म्हणून 2 ट्रॉफी जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरीही केली.
Leave a Reply