• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WITT Summit 2026 : मनमोहन सिंग सरकारच्या चुकीच्या निर्णयाची दुप्पट किंमत मोजावी लागली – PM मोदी

March 23, 2026 by admin Leave a Comment


टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी म्हणाले की 2004 ते 2010 या कालावधीत काय घडले? त्या काळात काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतींचे संकट निर्माण झाले होते. पण त्या वेळी काँग्रेसने देशाच्या हितापेक्षा स्वतःच्या सत्तेची अधिक काळजी घेतली. त्या काळात काँग्रेसने 1.48 लाख कोटी रुपयांचे ऑइल बॉण्ड्स जारी केले होते. तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतः मान्य केले होते की या निर्णयामुळे पुढील पिढ्यांवर कर्जाचा भार पडत आहे. याचा फटका आमच्या सरकारला बसला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काँग्रेसवर टीका

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2004 पासून 2010 पर्यंत काय झालं? काँग्रेसच्या काळात पेट्रोल डिझेलचं संकट आलं होतं. तेव्हा काँग्रेसने देशाची नव्हे तर आपल्या सत्तेची चिंता केली. तेव्हा काँग्रेसने 1 लाख 48 हजार करोड रुपयांचे ऑईल बाँड जारी केले होते, त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले होते की, ते येणाऱ्या पिढीवर कर्जाचा बोजा टाकत आहे. ऑईल बाँडचा निर्णय चुकीचा आहे हे माहीत असूनही रिमोट कंट्रोलने सरकार चालवणाऱ्यांनी आपली सत्ता वाचवण्यासाठी हा चुकीचा निर्णय घेतला.

आम्ही काँग्रेसचं पाप धुतलं – PM मोदी

कारण उत्तरदायित्व नव्हते. त्या बाँडवर रिपेमेंट 2020 नंतर करायचे होते. आमच्या सरकारने पाच सहा वर्षात काँग्रेस सरकारचे ते पाप धुण्याचं काम केलं आहे. त्या धुलाईचा खर्च कमी आला नाही. अशी लॉन्ड्री तुम्ही पाहिली नसेल. 1 लाख 48 हजार कोटी रुपयांच्या जागी देशाला 3 लाख कोटीहून अधिकचे पेमेंट करावा लागला. कारण त्यात व्याजही आलं होतं. आम्ही जवळपास दुप्पट रक्कम चुकवली. आजकाल काँग्रेसचे नेते भाषणांची मिसाईल सोडत आहेत, त्यांच्या या विषयाचा संदर्भ येताच त्यांची बोलती बंद होते.

पुढे जागतिक परिस्थिती आणि युद्धावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘जगात कितीही अस्थिरता असली तरी भारताने आपल्या प्रगतीचा वेग कायम ठेवला आहे. जर मी 28 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू झाल्यानंतरच्या मागील 23 दिवसांचा आढावा घेतला, तर देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तर ते दक्षिणपर्यंत हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांवर काम झाले आहे. दिल्ली मेट्रो रेलच्या महत्त्वाच्या कॉरिडोरचे लोकार्पण, सिलचर येथील हाय-स्पीड कॉरिडोरचे भूमिपूजन, कोटा येथे नव्या विमानतळाचे भूमिपूजन, मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देणे अशी अनेक महत्त्वाची कामे या 23 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लिंगपिसाट खरातचा एपस्टिन होणार? करुणा मुंडे यांच्या विधानाने खळबळ; काय केली मागणी?
  • Vaibhav Suraywanshi: वैभव सूर्यवंशीची तुफान खेळी पाहून विराट कोहलीही दंग! सामना संपल्यानंतर केले असे काही की…
  • टोयोटाचा धमाका! अवघ्या 40 महिन्यांत विकल्या गेल्या 2 लाख गाड्या, ‘या’ 7 सीटर कारने उडवली झोप, किंमत फक्त..
  • छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले, पायलटची मोठी चूक, हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड न करता…
  • बोल्ड सीन असणारे 5 चित्रपट, ज्यामध्ये अभिनेत्रींनी पार केल्या सर्व मर्यादा, आता OTT वर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in