• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WITT Summit 2026: ‘भारत आणि जग’ थीम असलेल्या समिटच्या दुसऱ्या दिवशी राजकारण, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी

March 21, 2026 by admin Leave a Comment


नवी दिल्ली : भारताला केंद्रस्थानी ठेवणारा प्रमुख विचारमंच व्हाट इंजिया थिंक टुडे समिट 2026 (WITT Summit 2026) ची चौथी आवृत्ती आपल्या भेटीसाठी येणार आहे. 23-24 मार्च 2026 रोजी राजधानी दिल्लीत आयोजित या समिटचे मुख्य आकर्षण म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य भाषण. पंतप्रधान तिसऱ्यांदा या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. टीव्ही 9 नेटवर्कद्वारे आयोजित या समिटचा उद्देश भारताच्या आर्थिक महत्त्वाकांक्षा, राजकीय बदल, तांत्रिक प्रगती आणि सामाजिक चिंतन या टप्प्यांचे चित्रण करणे आहे. भारत आणि जग (India & The World) या थीमअंतर्गत हा कार्यक्रम विकसित भारतासाठी एक आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करतो.

राजकीय व्यक्तींचा सहभाग

पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर दुसऱ्या दिवशीही कार्यक्रम तितक्याच उत्साहात सुरू राहणार आहे. दुसऱ्या दिवशी देशातील प्रमुख राजकीय नेते भारताची जागतिक स्तरावरील भूमिका यावर आपले विचार मांडणार आहेत. दुसऱ्या दिवशी स्मृती इराणी, पियुष गोयल आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची भाषणे विशेष आकर्षण ठरणार आहेत. याशिवाय भगवंत मान (पंजाबचे मुख्यमंत्री), मोहन यादव (मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री) आणि डी के शिवकुमार (कर्नाटकचे उपमुख्यमंत्री) हे नेतेही आपले विचार मांडणार आहेत.

या समिटमध्ये लोकसभा खासदार अखिलेश यादव आणि असदुद्दीन औवेसी यांचीही भाषणे महत्त्वाची ठरणार आहेत. तसेच भारतातील इस्रायलचे राजदूत रेउवेन अझर यांची उपस्थितीही महत्त्वाची ठरणार आहे. राजकारणासोबतच इतर क्षेत्रातील मान्यवरांचाही समावेश आहे. मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ राम चरण आणि प्रख्यात हिंदी कवी कुमार विश्वास हे मान्यवरही सहभागी होणार आहेत.

क्रीडा क्षेत्रातील दिग्गज लावणार हजेरी

या समिटच्या दुसऱ्या दिवशी भारतीय क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांशी संवादही आयोजित करण्यात आला. यामध्ये क्रिकेटचे दिग्गज सौरव गांगुली, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग हे क्रिकेटपटू हजर असणार आहेत. तसेच महिला क्रिकेटमधील दीप्ती शर्मा आणि प्रशिक्षक अवष्कार साळवीही या मंचावर हजर राहणार आहेत. WITT Summit 2026 हे देशातील सर्वात प्रभावशाली आणि व्यापक विचारमंथन कार्यक्रमांपैकी एक ठरणार आहे, यात विविध क्षेत्रांतील दिग्गज एकत्र येऊन भारताच्या जागतिक भूमिकेवर चर्चा करणार आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Devendra Fadnavis | सुरांचा अमर आवाज हरपला… आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भावनिक वक्तव्य
  • Asha Bhosle : दैवी आवाजासह हातालाही सुरेख चव.. आशा भोसलेंच्या जगभरातील रेस्टॉरंट्सबद्दल हे माहित आहे का ?
  • Asha Bhosale: आशा भोसले यांच्या कुटुंबात कोण-कोण? जाणून घ्या फॅमिली ट्रीबद्दल
  • Asha Bhosle: आशा भोसले यांचं संघर्षमयी खासगी जीवन; वयाच्या 47 व्या वर्षी मिळालं दुसरं प्रेम
  • Asha Bhosale : जगातील सर्वात मोठा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आशा ताईंच्या नावावर, जाणून व्हाल अवाक्

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in