• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WIND vs WSL : श्रीलंकेची पुन्हा धुलाई फिक्स! भारताची बॅटिंग, स्मृती मंधाना प्लेइंग ईलेव्हनमधून आऊट

December 30, 2025 by admin Leave a Comment

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20i मालिकेतील पाचवा आणि 2025 या वर्षातील शेवटचा सामना हा तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेच्या बाजूने सलग दुसऱ्यांदा नाणेफेकीचा कौल लागला. श्रीलंकेची कॅप्टन चमारी अट्टापट्टू हीने भारताला बॅटिंगचं आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या गोलंदाजांची पुन्हा एकदा धुलाई होणार असल्याचं निश्चित झालं आहे. भारताने चौथ्या टी 20i सामन्यात टॉस गमावून बॅटिंग करताना 221 धावांपर्यंत मजल मारली होती. आता महिला ब्रिगेड अंतिम सामन्यात किती धावा करते? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल

टीम इंडियाचा हा सामना जिंकून श्रीलंकेला 5-0 ने क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच भारताने मालिका जिंकली असल्याने हा सामना औपचारिकता आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. उपकर्णधार आणि ओपनर बॅट्समन स्मृती मंधाना हीला विश्रांती देणयात आली आहे. स्मृतीच्या जागी 17 वर्षीय जी कामिलिनी हीचं पदार्पण झालं आहे. तर रेणुका सिंह ठाकुर हीच्या जागी ऑलराउंडर स्नेह राणा हीला संधी देण्यात आली आहे.

श्रीलंकेडून 2 बदल

तसेच श्रीलंकेकडूनही प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. इनोका रनवीरा आणि मलकी मदारा या दोघींचं कमबॅक झालं आहे. तर मलाशा शेहानी आणि काव्या काविंदी या दोघींना प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर करण्यात आलं आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शफाली वर्मा, जी कमलिनी, ऋचा घोष (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा आणि श्री चरणी.

श्रीलंका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हसिनी परेरा, चमारी अट्टापट्टू (कर्णधार), इमेषा दुलानी, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षीका सिल्वा, रश्मिका सेवावंडी, कौशली नुथ्यांगना(विकेटकीपर), निमाशा मदुशानी, इनोका रणवीरा आणि मलकी मदारा.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs SL : टीम इंडियाकडून श्रीलंकेला 176 धावांचं आव्हान, महिला ब्रिगेड 2025 मधील शेवटचा सामना जिंकणार?
  • शाहीन आफ्रिदीसोबत बिग बॅश लीगमध्ये काय झालं? पीसीबीने तडकाफडकी मायदेशी बोलवलं
  • Municipal Election 2026 : तिकीट न मिळाल्याने कुठे टीव्ही सेट फोडले, कुठे नेत्यांचे पोस्टर्स फाडली
  • ‘धुरंधर’सारखा चित्रपट बनवणं सर्वांत मोठा मूर्खपणा..; प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत
  • महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलं! राज ठाकरे यांची थेट अजितदादांशी युती; किती जागांवर लढणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in