• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WI vs ZIM : वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला चिरडलं, 107 धावांनी केला पराभव

February 23, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील तिसरा सामना वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. कारण वेस्ट इंडिजच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली. वेस्ट इंडिजने 20 षटकात 6 गडी गमवून 254 धावा केल्या. तसेच विजयासाठी 255 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना झिम्बाब्वेने नांगी टाकली आणि 107 धावांनी पराभव झाला. त्यामुळे वेस्ट इंडिजने ग्रुप 1 मध्ये पहिलं स्थान गाठलं आहे. तर झिम्बाब्वेची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. वेस्ट इंडिजचा नेट रनरेट हा +5.350, दक्षिण अफ्रिकेचा नेट रनरेट +3.800, भारताचा नेट रनरेट -3.800 आणि झिम्बाब्वेचा नेट रनरेट हा -5.350 आहे.

झिम्बाब्वेचा डाव

वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवलेल्या 254 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव अडखळला. सुरूवातीला झिम्बाब्वेच्या धडाधड विकेट पडल्या. त्यामुळे पावरप्लेमध्ये झिम्बाब्वेची पॉवर संपली. संघाची धावसंख्या 20 असताना धडाधड तीन विकेट पडल्या. तदिवानाशे मारुमणी 14, ब्रायन बेनेट 5, रायन बर्ल 0 अशा धावांवर बाद झाले. त्यानंतर डायन मायर्स आणि सिकंदर रझा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. चौथ्या विकेटसाठी या जोडीने 32 धावांची भागीदारी केली. पण संघाच्या 53 धावा असताना डायन मायर्स 28 धावा करून बाद झाला. त्यामुळे झिम्बाब्वेचा पराभव जवळपास निश्चित झाला. सिकंदर रझा 27, ताशिंगा मुसेकिवा 0, ग्रॅमी क्रेमर 0 आणि टोनी मुनयोंगा 14 धावा करून तंबूत परतले.

वेस्ट इंडिजचा डाव

वेस्ट इंडिजकडून सलामीला ब्रँडन किंग आणि शाई होप ही जोडी उतरली. या जोडीने सावध सुरुवात केली. पण संघाच्या 17 धावा असताना ब्रँडन किंगच्या रूपाने पहिला धक्का बसला. 9 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर शिमरोन हेटमायर मैदानात आला आणि त्याने गोलंदाजांवर प्रहार करण्यास सुरूवात केली. संघाच्या 54 धावा असताना शाई होपच्या रूपाने दुसरा धक्का बसला. त्याने 14 धावा केल्या आणि तंबूत परतला. त्यानंतर शिमरोन हेटमायर आणि रोव्हमॅन पॉवेल हे वादळ घोंघावलं. या दोघांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजीच्या चिंध्या उडवल्या. तिसऱ्या विकेटसाठी या जोडीने 52 चेंडूत 122 धावांची भागीदारी केली. हेटमायर 34 चेंडूत 85 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोवमॅन पॉवेलने धुलाई केली. त्याने 35 चेंडूत 59 धावा ठोकल्या. दुसरीकडे, रोमारियो शेफर्डने 21, जेसन होल्डरने 13 आणि शेरफन रुदरफोर्डने नाबाद 31 धावांची खेळी केली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इलेक्ट्रिक किटली मध्ये फक्त चहा आणि कॉफीच नाही तर ‘हे’ पदार्थ देखील काही मिनिटांमध्ये होतात तयार
  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in