• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WI vs SCO T20 WC Result: वेस्ट इंडिजने स्कॉटलँडला 35 धावांनी नमवलं, हेटमायर-शेफर्ड चमकले

February 7, 2026 by admin Leave a Comment

वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलँड सामन्यात क्रीडाप्रेमींचं चांगलंच मनोरंजन झालं. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. वेस्ट इंडिजची सुरूवात संथ झाली. पण त्यानंतर गती पकडली. वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 गडी गमवून 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. वेस्ट इंडिजकडून या धावांमध्ये शिमरोन हेटमायरचं योगदान राहिलं. हेटमायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. तेव्हा वेस्ट इंडिजच्या 8.2 षटकात 54 धावा होत्या. त्यानंतर हेटमायरने गिअर टाकला आणि धावांची गती वाढवली. त्याने 36 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकार मारत 64 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे वेस्ट इंडिजने 182 धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना स्कॉटलँडचा संघ गडगडला. चौथ्या विकेटसठी 78 धावांची भागीदारी वगळता काही खास करू शकले नाही. स्कॉटलँडने 18.5 षटकात सर्व गडी गमवून 147 धावा केल्या. स्कॉटलँडचा 35 धावांनी पराभव झाला.

शिमरोन हेटमायरनंतर गोलंदाजी रोमारियो शेफर्डने कमाल केली. त्याने एकाच षटकात चार विकेट घेतल्या. यात एका हॅटट्रीकची नोंद झाली. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग विकेट घेत या स्पर्धेतील पहिल्या हॅटट्रीकची नोंद केली. तर सहाव्या चेंडूवर विकेट घेत एकूण चार विकेट घेतल्या. शेफर्डने या सामन्यात एकूण 3 षटकं टाकली आणि 20 धावा देत पाच विकेट काढल्या.

वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप म्हणाला की, ‘ या स्पर्धांमध्ये चुकांसाठी काहीच जागा नाही. ही द्विपक्षीय मालिका नाही जिथे जर तुम्ही पराभवानंतर आलात तर मालिकेत परतण्यासाठी आणखी एक सामना असतो, परंतु चांगली सुरुवात हीच आमची अपेक्षा आहे. आम्हाला वाटले की आम्ही कदाचित धावसंख्या थोडी अधिक करू शकलो असतो, विशेषतः ईडन गार्डन्समध्ये. हे धावांचा पाठलाग करणारे मैदान आहे. मला वाटते की पहिला धावसंख्या 190 किंवा त्याहून अधिक असायला होती. त्यामुळे सुरुवात करणे थोडे आव्हानात्मक होते. मधल्या षटकांमध्ये फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि त्यांनी आपल्यात असलेली ताकद दाखवली हे पाहून आनंद झाला. पुन्हा चेंडूसह, यावेळी फक्त कठोर परिश्रम करून ते योग्य केले.’

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वाहन खरेदीपूर्वी ही बातमी वाचा, पेट्रोल कारच्या तुलनेत CNG कार फायदेशीर? इथे वाचा
  • पाकिस्तानला भारताविरूद्धचा सामना खेळावा लागणार? नेदरलँडमुळे सुपर 8 फेरीचं गणित बिघडलं
  • निरोगी हृदय आणि चमकदार केसासाठी तुमच्या आहारात समाविष्ट करा ‘ही’ व्हिटॅमिन ईचे पॉवरहाऊस असलेली फळं
  • कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ मूर्त्या ठेवणे पडू शकते महागात, जाणून घ्या हे वास्तू नियम
  • जरांगे पाटील यांची मानसिकता तपासली पाहिजेत, लक्ष्मण हाके यांचा जोरदार हल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in