• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WI vs SA Super 8 Live Streaming : विंडीज-दक्षिण आफ्रिका सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, कोण जिंकणार?

February 26, 2026 by admin Leave a Comment


इंग्लंड क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तर आता उर्वरित 3 जागांसाठी चुरस पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत गुरुवारी 26 फेब्रुवारीला डबल हेडरचा थरार रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात यजमान टीम इंडियासमोर झिंबाब्वेचं आव्हान असणार आहे. तर या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात 2 अजिंक्य संघ आमनेसामने असणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीतील 4 आणि सुपर 8 मधील 1 असे आतापर्यंत एकूण 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुरुवारी कोणता संघ विजयी षटकार लगावत सेमी फायनलचा दावा आणखी मजबूत करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान उभयसंघातील या सामन्याबाबत आपण जाणून घेऊयात.

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कधी?

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना गुरुवारी 26 फेब्रुवारीला होणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कुठे?

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेजियममध्ये होणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका विंडीजवर वरचढ

दरम्यान दक्षिण आफ्रिका टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात वरचढ राहिली आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने विंडीज विरुद्ध 5 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर विंडीजला एकमेव सामना जिंकता आला आहे. त्यामुळे आता उभयसंघातील सहाव्या सामन्यात कोण विजयी होणार? हे निकालनंतरच स्पष्ट होईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in