• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?

April 11, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या, अवेळी बरसणाऱ्या पावसाचा धूमाकूळ आता संपताना दिसत असून राज्यातून पावासने माघार घेतल्याचं चित्र दिसतंय. मात्र पावसाचं संकट दूर झालं असलं तरी वाढत्या उन्हाच्या झळांनी राज्यातील नागरिकांच्या त्रासात भर पडण्याची चिन्हं आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाळी हवामान होतं. त्यामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली होती. मात्र, राज्यातील पश्चिमी विक्षोभ प्रभावहीन असून पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असल्याने, उन्हाच्या झळा तापदायक ठरणार आहेत. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने हवामाना विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागातील नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नागरिकांना भर उन्हात बाहेर न पडण्याचा, उन्हाच्या तडाख्यापासून स्वत:चं संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वाढणार उन्हाचा कडाका

राज्यातील कमाल तापमान अचानक वाढलं असून येत्या काही दिवसांत उन्हाचा कडाका आणखीनच वाडणार आहे. सूर्य नारायणाने आग ओकण्यास सुरूवात केली असून पुढील काळात उन्हाचे चटके बसून घामाच्या धारा वाहण्यास सुरूवात होणार आहे. हवामान विभागाकडून पुढील चार आठवड्याचा हवामानाचा अंदाज प्रसिद्ध करण्यात आला आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यादरम्यान राज्यातील काही भागात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअच्या वरही जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानातही वाढ होण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सध्या तापमानाचा पारा 35 अंशांपर्यंत असला तरी येत्या काही काळात यामध्ये मोठी वाढ होऊन तापमान हे 5 ते 6 अंश आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि जळगाव पट्ट्यात तापमानाचा पारा 40 अंशांपार जाऊ शकतो.

कोकणात यलो अलर्ट

दरम्यान हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसारख्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये कमाल तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तापमानाचे आकडे जरी खूप जास्त वाटत नसले तरी, हवेतील आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष जाणवणारी उष्णता खूप जास्त असेल, ज्यामुळे लोकांना अत्यंत दमट हवामानाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे चिकचिकही वाढू शकते. मुंबईसारख्या शहरांमध्ये, दमट उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था
  • मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच कायदा? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, म्हणाले मी ऑफिशियली सांगतोय की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in