• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Weather Alert : आज रात्री येणार मोठी आफत… यावेळचं संकट मोठं, वेधशाळेचा इशारा; या राज्यांना मोठा धोका

April 8, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही महिन्यांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. अवकाळी पाऊस, वेगाने वाहणारे वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. कोणत्याही राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात कधीही पाऊस कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज रात्री तर देशातील काही राज्यात मोठी आफत येणार आहे. वादळी वारे वाहणार असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. येणाऱ्या काळात हवामानात मोठे बदल होणार आहेत. मात्र, पावसाचा परिणाम सर्वत्र एकसारखा राहणार नाही. तर कमी अधिक प्रमाण असणार आहे. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळणार असून काही ठिकाणी वादळी पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भय निर्माण झालं आहे.

भारतीय हवामान विभागाने यावर भाष्य केलं आहे. वेस्टर्न डिस्टरबेन्समुळे भूमध्य सागरातून आर्द्रता घेऊन येणारी हवामान प्रणाली विकसित होत आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर भारतात पाऊस, मेघगर्जना आणि गारपीट होणार आहे. गुरुग्राम, दक्षिण दिल्ली, फरीदाबाद आणि नोएडा या भागातही आज सोमवार, दिनांक 6 एप्रिल रोजी रात्री वादळी वारे आणि पावसाची सर्वाधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज रात्रीही आफत…

गुरुग्राममध्ये काल वादळीवारे आणि पावसाचे ढग दाटून आले होते. त्यामुळे अत्यंत कमी वेळात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. गारपीटही झाली. आज रात्रीही अशीच परिस्थिती होणार आहे. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे आज रात्रीही पावसाची आफत येणार आहे. एनसीआरच्या सुमारे 50 ते 60 टक्के भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या मते, आधीपेक्षा आता आणखी अतिशक्तीशाली ढग मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे 7 ते 9 एप्रिलच्या दरम्यान मोठ्या भागात प्रचंड अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

या राज्यांना फटका

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राजस्थान, दिल्ली-एनसीआर, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू, पंजाब, पश्चिमी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तर मध्यप्रदेश आणि उत्तर पूर्व भारतात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे देशाच्या एकूण 30 ते 40 क्षेत्रफळावर मोठा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शेतकऱ्यांना खास सल्ला

ज्या शेतकऱ्यांचा गहू कापणीला आला असेल त्यांना 6 एप्रिलपर्यंत गहू काढणीचा सल्ला देण्यात आला आहे. आधीच्या नैसर्गिक संकटामुळे आधीच मोठं नुकसान झालं आहे. 3 आणि 4 एप्रिल रोजी गारपीट झाल्याने राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील गव्हाची शेते उद्ध्वस्त झाली आहेत. यावेळी त्याहीपेक्षा मोठं संकट येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • देश गाजवणाऱ्या भाजपच्या माजी महिला मुख्यमंत्र्यावर आली रस्त्यावर पोहे, जिलेबी विकण्याची वेळ, कारण काय?
  • ब्ल्यू टी पिण्याचे आहेत फायदेच फायदे, जाणून घ्या शरीरात नेमका काय बदल होतो?
  • MI vs RR : मुंबई इंडियन्स हरल्यानंतर हार्दिक पंड्याने वैभव सूर्यवंशीबद्दल एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल केली की तो..
  • IPL 2026 : वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह आमनेसामने! टीम इंडियासाठी महत्त्वाचा सामना
  • जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होता, तिथेच..संजय राऊतांचे बोचरे शब्द

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in