• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Washington Sundar : 2017 साली पदार्पण, 9 वर्षांनंतर पहिलं अर्धशतक, सुंदरची अखेर प्रतिक्षा संपली

April 8, 2026 by admin Leave a Comment

गुजरात टायटन्सची आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आतापर्यंत निराशाजनक सुरुवात राहिली. गुजरात टायटन्सला आपल्या मोहिमेतील पहिले आणि सलग 2 सामने गमवावे लागले आहेत. त्यानंतर गुजरातने 8 एप्रिलला अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध द्विशतक पूर्ण केलं आहे. गुजरातने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 210 धावा केल्या आहेत. गुजरातसाठी पहिल्या 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठत 200 पार पोहचवण्यात योगदान दिलं. गुजरातसाठी या 5 पैकी 3 फलंदाजांनी अर्धशतक झळकावलं. मात्र एका फलंदाजासाठी हे अर्धशतक फार अविस्मरणीय असं ठरलं. तो फलंदाज कोण आहे? याबाबत जाणून घेऊयात.

गुजरातसाठी ओपनर साई सुदर्शन याने 12 आणि ग्लेन फिलिप्स याने नाबाद 14 धावा केल्या. दोघांना ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र दोघेही या खेळीला मोठ्या आकड्यात बदलण्यात अपयशी ठरले. तर कॅप्टन शुबमन गिल, जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी अर्धशतक झळकावलं. शुबमनने गुजरातसाठी सर्वाधिक धावा केल्या. शुबमनने 45 बॉलमध्ये 70 रन्स केल्या. जोसने 27 चेंडूत 52 धावांचं योगदान दिलं. मात्र या दोघांपेक्षा ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदरसाठी अर्धशतक खास ठरलं.

वॉशिंग्टन सुंदरचं पहिलंवहिलं अर्धशतक

सुंदरने दिल्ली विरुद्ध 32 चेंडूत 171.88 च्या स्ट्राईक रेटने 55 रन्स केल्या. सुंदरने 55 पैकी 36 रन्स या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. सुंदरने 55 धावांच्या खेळीत 2 षटकार आणि 6 चौकार लगावले. सुंदरने त्याच्या कारकीर्दीतील 10 व्या पर्वात हे पहिलं अर्धशतक झळकावलं. सुंदरने यासह पहिल्या अर्धशतकाची प्रतिक्षा संपवली.

सुंदर आणि आयपीएल पदार्पण

सुंदरने 2017 साली वयाच्या 17 व्या वर्षी आयपीएल पदार्पण केलं. सुंदर स्पिन ऑलराउंडर आहे. मात्र सुंदरची बॅटिंगसाठी येण्याचं स्थान निश्चित नाही. ऑलराउंडर असल्याने सुंदरच्या बॅटिंग स्थानात सोयी आणि गरजेनुसार बदल केला गेला. त्यामुळे सुंदरला तुलनेत बॅटिंगची फारशी संधी मिळाली नाही. मात्र सुंदरला 8 एप्रिलला चौथ्या स्थानी खेळण्याची संधी मिळाली. सुंदरने या संधीचं सोनं केलं आणि आपल्या कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक पूर्ण केलं.

सुंदरची आयपीएल कारकीर्द

दरम्यान सुंदरने आयपीएल स्पर्धेत गुजरातआधी एकूण 3 संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. सुंदरने रायजिंग पुणे सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं आहे. सुदंरने आतापर्यंत 69 सामन्यांमध्ये 588 धावा केल्या आहेत. तसेच सुंदरने 40 विकेट्सही मिळवल्या आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pakistan Mediation : हीच पाकिस्तानची औकात, ज्यांच्यात मध्यस्थी घडवणार त्यांच्यातल्या एका देशाला म्हटलं कॅन्सर
  • आठवड्याच्या ‘या’ दिवशी केस धुवावेत, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळण्यासोबत आरोग्यावर होतो सकारात्म परिणाम
  • Gold Price Today : युद्धविरामानंतर सोनं स्वस्त, ही संधी सोडू नका .. पुढला काय भरवसा ? सोनं-चांदीचे आजचे दर काय ?
  • पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..
  • कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in