• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Virat Kohli : विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर

March 18, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. एकूण 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयकडून पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 28 मार्चपासून एकूण 16 दिवस 4 डबल हेडरसह 20 सामन्यांचा थरार रंगणार आहे. तर लवकरच उर्वरित सामन्यांचं वेळापत्रकही जाहीर केलं जाणार आहे. या 19 व्या मोसमासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या मोसमात गतविजेता म्हणून मैदानात उतरणार आहे. या मोसमात आरसीबीचा प्रमुख सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्या निशाण्यावर मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

आरसीबीने 18 व्या मोसमात रजत पाटीदार याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सला पराभूत करत पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यामुळे आरसीबाचा या मोसमात गतविजेता म्हणून उल्लेखनीय कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. विराटने या मोसमासाठी लंडनमध्ये काही दिवस जोरदार सराव केला. तर विराट लवकरच आरसीबीसह जोडला जाणार आहे. विराट त्यानंतर आणखी जोरात सराव करणार आहे. विराट आयपीएलमध्ये अनेक बाबतीत नंबर 1 आहे. यंदा विराटकडे आणखी एका बाबतीत नंबर 1 होण्याची मोठी संधी आहे.

विराट मोठा विक्रम करणार?

विराटने आयपीएलच्या इतिहासात सुरुवातीपासून ते आतापर्यंत आरसीबीचं प्रतिनिधित्व केलं आहे. विराटने या दरम्यान काही काळ आरसीबीचं नेतृत्व केलंय. विराटने या स्पर्धेच्या इतिहासात असंख्य विक्रम केले आहेत. विराट आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतकं आणि सर्वाधिक अर्धशतकं करणारा एकमेव फलंदाज आहे. आता विराटला आणखी एका बाबतीत नंबर 1 होण्याची संधी आहे.

विराटकडे आता एका टीमसाठी सर्वाधिक वेळा एका डावात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होण्याची संधी आहे. सध्या हा विक्रम संयुक्तरित्या डेव्हिड वॉर्नर आणि विराटच्या नावावर आहे. विराट आणि वॉर्नर हे दोघे प्रत्येकी 66-66 वेळा टीमसाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहे. वॉर्नर यंदा 19 व्या मोसमाचा भाग नाही. त्यामुळे विराट सहजासहजी वॉर्नरला मागे टाकू शकतो.

विराटची आयपीएल कारकीर्द

तसेच विराटला या 19 व्या मोसमात आयपीएल स्पर्धेच्या इतिहासत 9 हजार धावा करण्याची संधी आहे. विराटने आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत 267 सामन्यांमधील 259 डावांमध्ये 8 हजार 661 धावा केल्या आहेत. विराटने आयपीएल इतिहासात एकूण 71 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्यात. आता विराट कोहली याला 9 हजार धावा करण्यासाठी 339 रन्सची गरज आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इस्लामाबादच्या बैठकीआधीच भारताचा मोठा गेम, रातोरात भारताची अमेरिकेसोबत… काय घडलं दोन देशात?
  • Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे मुकुल चौधरी?
  • ज्या हॉटेलमध्ये वडील वेटर होते, तेच हॉटेल या अभिनेत्याने विकत घेतलं, वडिलांना दिलं खास गिफ्ट
  • तुम्ही दररोज नकळत खाताय प्लास्टिक? आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर!
  • संधी मिळताच पाकिस्तानने दाखवले दात… नोबेल पुरस्काराच्या मागणीच्या यादीतून ट्रम्प गायब; कोणत्या तीन लोकांसाही हवाय पुरस्कार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in