
आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) इतिहास घडवला. आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात तब्बल 18 वर्षांची प्रतिक्षा संपवत पहिलीवहिली आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. या ऐतिहासिक कामगिरीसह आरसीबीच्या निष्ठावंत चाहत्यांनी अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली. आरसीबीला चॅम्पियन करण्यात रजत पाटीदार, विराट कोहली आणि विकेटकीपर जितेश शर्मा या तिघांनी महत्त्वाचं योगदान दिलं. जितेशने रजतच्या अनुपस्थितीत काही सामन्यात नेतृत्वही केलं. जितेशने कॅप्टन्सी, विकेटकीपिंग आणि बॅटिंग अशा तिन्ही आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध केलं आणि चाहत्यांची मनं जिंकली. मात्र जितेश शर्माच्या एका निर्णयामुळे आरसीबीच्या चाहत्यांचं डोकं सटकलंय. जितेश शर्मा याने एका मुलाखतीत आयपीएलमधील ऑलटाईम बेस्ट प्लेइंग ईलेव्हन टीम सांगितली. जितेशच्या या बेस्ट प्लेइंग ईलेव्हन मध्ये विराटचं नाव नसल्याचं चाहते संतापले आहेत.
विराट आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक 8 शतकांचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे. मात्र त्यानंतरही जितेशने त्याच्या बेस्ट प्लेइंग ईलेव्हनमध्ये विराटला संधी दिली नाही. तसेच जितेशच्या बेस्ट प्लेइंग ईलेव्हनमध्ये विराटसह यॉर्कर किंग लसिथ मलिंगा, ऑलराउंडर सुनील नारायण, ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर यांचाही समावेश नाही.
जितेश शर्माची आयपीएलमधील ऑलटाईम बेस्ट प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, एडम गिलख्रिस्ट, सूर्यकुमार यादव, जॅक कॅलिस, हार्दिक पंड्या, महेंद्रसिंह धोनी, एबी डिव्हीलियर्स, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि जॉश हेजलवूड.
Leave a Reply