• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Virat Kohli चा नववर्षातील पहिल्याच मालिकेत धमाका, न्यूझीलंड विरुद्ध 6 रेकॉर्ड उद्धवस्त

January 19, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात 2026 मधील पहिली आणि एकदिवसीय मालिका गमावली. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत होती. मालिकेतील तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे रविवारी 18 जानेवारीला इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र भारताला या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. भारताने या सलग दुसऱ्या सामन्यासह मालिका गमावली. भारताला न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 338 धावांचा पाठलाग करताना 296 धावांपर्यंतच मारता आली. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने या सामन्यात शतक झळकावलं. विराटने भारतासाठी झुंजार खेळी करुन विजयी करण्याचा प्रयत्न केला. मात्र विराटला दुसऱ्या बाजूने अपवाद वगळता साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच विराटचं शतक व्यर्थ गेलं.

विराटने या सामन्यात 108 बॉलमध्ये 124 रन्स केल्या. विराटने या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार लगावले. विराटचं हे या वर्षातील पहिलवहिलं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. तसेच विराटने या 3 सामन्यांच्या मालिकेत 80 च्या सरासरीने 240 धावा केल्या. विराटने या मालिकेत एकूण 6 विक्रम केले. त्याबाबत आपण जाणून घेऊया.

वेगवान 28 हजार आंतरराष्ट्रीय धावा

विराटने या मालिकेदरम्यान वेगवान 28 हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. विराटने यासह कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर या दोघांना मागे टाकलं. विराटने 624 डावांत 28 हजार धावा केल्या. तर सचिनने 644 तर संगाकारा याने 666 डावांत 28 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा दुसरा फलंदाज

विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा एकूण दुसरा आणि पहिला सक्रिया फलंदाज ठरला आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. विराटने या मालिकेत कुमार संगकारा याला मागे टाकत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज हा बहुमान मिळवला. विराटने 626 डावांत एकूण 28 हजार 215 धावा केल्या आहेत. तर संगकाराच्या नावावर 28 हजार 16 धावा आहेत. तर सचिनच्या नावावर सर्वाधिक 34 हजार 357 धावा आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड

विराटने इंदूरमधील सामन्यात शतक झळकावताच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. विराटने वीरेंद्र सेहवाग आणि रिकी पाँटिंग या दोघांना मागे टाकत न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक 7 एकदिवसीय शतकं लगावणारा फलंदाज ठरला.

तिसऱ्या स्थानी सर्वाधिक एकदिवसीय धावा

विराटने रिकी पाँटिंग याचा वनडेत तिसऱ्या स्थानी खेळताना सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटने तिसऱ्या स्थानी खेळताना 299 डावांत 12 हजार 676 धावा केल्यात. तर पाँटिंगने 12 हजार 662 धावा केल्या होत्या.

न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं

विराट कोहली न्यूझीलंड विरुद्ध वनडेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी 20I) सर्वाधिक 10 शतकं लगावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

सलग 5 वेळा 50 पेक्षा अधिक धावा

विराटच्या नावावर सलग 5 डावांत 50 पेक्षा अधिक धावांचा विक्रम आहे. विराटने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडेत 93 धावा करत हा कारनामा केला होता. विशेष म्हणजे विराटची सलग 5 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याची ही पाचवी वेळ ठरली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर
  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in