• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vijay Vadettiwar: खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर… विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने शिलगला वाद, असे काढले माप

April 11, 2026 by admin Leave a Comment


Vijay Vadettiwar on Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणाने नाशिकच नाही तर राज्य आणि देश हादरला आहे. या भोंदूबाबामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली आहे. त्याच्यासोबत अनेक राजकीय नेत्यांच्या बैठका आणि व्यवहार आता लपलेले नाहीत. अनेक महिला आणि व्यापारी धाडसाने त्याच्याविरोधात पुढे सरसावल्या आहेत. राजकीय वलयाचा फायदा घेत खरातने अनेकांचे जीव नासवले. विरोधक खरातप्रकरणावरून सरकार आणि यंत्रणांना टार्गेट करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकेची संधी सोडली नाही.

मुसलमान असता तर…

अशोक खरात याच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर सर्व मुसलमानांची वरात काढली असती असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. जात धर्म न पाहता नालायक व्यक्तीला नालायक म्हणण्याची हिंमत समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी याप्रकरणात समाजाची आणि सध्याच्या मानसिकतेची कानउघडणी केली.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपुरात तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवा अंतर्गत आज संध्याकाळी चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे श्रीमंत कोकाटे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या व्याख्यानाचे उद्घाटक म्हणून माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे उपस्थित होते, त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

खरात प्रकरण सरकारनेच बाहेर काढले

तर वडेट्टीवार यांच्या या विधानावर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जेव्हा हे प्रकरण आले. तेव्हा नाशिक पोलिसांना त्यांनी सूचना दिली. गुप्तपणे त्याला रात्रीतून अटक करण्यात आली आहे. त्याला अटक करण्यात आणि हे प्रकरण बाहेर काढण्यात सरकारचाच हात असल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये खरात प्रकरणावरून द्वंद सुरू आहे. तर खरात याचे दिवसागणिक एक एक प्रकरणं बाहेर येत आहेत. तर याप्रकरणाच्या अवतीभोवती राजकीय कथाही रचल्या जात आहे. त्यात खरात आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा ही करण्यात येत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • EPFO withdrawal rules: आता UPI माध्यमातून काढा PF, नवीन नियम जाणून घ्या नाहीतर अटकणार क्लेम!
  • Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट… शिजूका नॉडीचे असंख्य फोन कॉल्स… नव्या एन्ट्रीने सर्वांनाच फुटला घाम; एका दाव्याने राज्यात मोठी खळबळ
  • Arvind Sawant | ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, अरविंद सावंत- उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक, ठाकरे गटाअंतर्गत घडामोडींना वेग
  • दिसायला सेम पण पेट्रोल कारपेक्षा इलेक्ट्रिक गाड्या जास्त जड का ? 90 टक्के लोकांना हे माहीतच नसतं
  • Vaibhav Sooryavanshi : वैभवचा सिनियर टीम इंडियात समावेश कधी? अनिल कुंबळेंचे रोखठोक उत्तर, एकवेळ अशी येते जेव्हा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in