
अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांचे लग्न अगदी शाही थाटात झाले आहे. विवाहबंधनात अडकल्यानंतर या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Photo Credit: rvreventzdesign
विशेष म्हणजे हे फोटो त्यांच्या विवाह स्थळाचे असल्याने त्यांनी लग्नासाठी ठेवलेल्या या थीमची सगळीकडे चर्चा होत आहे. या दोघांनीही शाही थाटात लग्न केलं असलं तरीही डेकोरेशनची थिम मात्र त्यांनी पारंपरिकच ठेवली होती. Photo Credit: rvreventzdesign
लग्न होताच रश्मिका आणि विजय या दोघांनही त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर काही फोटो शेअर केले होते. परंतु आता समोर आलेले फोटो काहीसे वेगळे आहेत. रश्मिका आणि विजय यांच्या लग्नाचे नियोजन करणाऱ्या कंपनीनेच त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर हे फोटो पोस्ट केले आहेत. Photo Credit: rvreventzdesign
रश्मिका-विजय यांना आपल्या लग्नाच्या माध्यमातून देशाच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवून आणायचे होते. त्यांच्या विवाह सोहळ्याची थीम द पिरिऑडिक इरा अशी ठेवण्यात आली होती. या थीमनुसार विजय देवरकोंडा याच्या हातात एक तलवार असल्याचे दिसत आहे. Photo Credit: rvreventzdesign
या तलवारीवर असलेले नक्षीकामही खूपच आकर्षक आहे. लग्नाच्या या ठिकाणी सुशोभीकरणासाठी खूप गर्दी न करता पांढरा आणि लाल रंगाच्या वस्तूंनी विवाहस्थळ चांगले संजवण्यात आले होते. विवाहस्थळ निसर्गासोबत कसे एकरुप होईल हा विचार लक्षात ठेवूनच सुशोभीकरण करण्यात आले होते. Photo Credit: rvreventzdesign
विशेष म्हणजे या विवाहाप्रसंगी परिसरात हत्ती, मानवी मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. रश्मिकाला बसण्यासाठी डोलीदेखील होती. ती डोलीत बसल्याचे काही फोटोही समोर आले आहेत. लग्न झाल्यानंतर हे कपल घरी परतले आहे. परंतु अजूनही त्यांच्या लग्नाची चर्चा थांबलेली नाही. Photo Credit: rvreventzdesign





Leave a Reply