• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video: सासरी शेवंताचं मेठ्या थाटात स्वागत, अभिनेत्रीने घेतलेला उखाणा तुम्ही कधी ऐकलाय?

March 5, 2026 by admin Leave a Comment


Actress Apurva Nemlekar: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही… अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अपूर्वा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेत शेवंताची भूमिका बजावली आणि चाहत्यांनी अपूर्वाला डोक्यावर घेतलं. सध्या अपूर्वा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली आहे. अभिनेत्री 14 फेब्रुवारी रोजी लग्न करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले.

आता अपूर्वा हिने आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. अपूर्वा हिने पोस्ट केलेला व्हिडीओ गृहप्रवेशाचा आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री ‘आमच्या प्रेमाने पत्ता शोधला आहे…’ असं कॅप्शन लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अपूर्वा हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, सासरच्या घरात प्रवेश करताना अभिनेत्री नवऱ्यासाठी उखाणा देखील घेतला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Apurva Nemlekar Govalkar (@apurvanemlekarofficial)

 

उखाणा घेत अपूर्वा म्हणाली, ‘अंगणात आहे तुळस, तुळशीजवळ लावला दिवा… तनुज रावांचं नाव घेते जन्मोजन्म असात जोडीदार हवा…’, असा हटके उखाण अभिनेत्रीने घेतला. अपूर्वा हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये लग्नानंतर सत्यनारायणाच्या पूजेला बसलेले देखील दिसत आहेत.

अपूर्वा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचं हे दुसरं लग्न आहे. अपूर्वा हिचं पहिलं लग्न शिवसेनेच्या अधिकाऱ्यासोबत झालं होतं. 2024 मध्ये अपूर्वा हिचं पहिलं लग्न झालं होतं. तब्बल 8 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांना विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अपूर्वा हिच्या पहिल्या पतीचं  नाव रोहन देशपांडे असं आहे.  रोहन देशपांडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघे राजकारणात सक्रिय आहेत. रोहन देशपांडे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. ते दादर याठिकाणी राहतात. तर शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमात रोहन उपस्थित असतात. रोहन हे सिनेसृष्टीतील देखील अनेक कलाकारांना ओळखतात.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…
  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…
  • Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?
  • Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
  • IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in