• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video : बॉयफ्रेंडला घरी बोलवलं, नंतर केलं पेटीमध्ये बंद, पुढे घडलं असं काही की…भयंकर प्रकाराने खळबळ!

January 24, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे, जिथे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला चक्क लोखंडी पेटीत 45 मिनिटे कोंडून ठेवले होते. समोर आलेल्या माहितीनुसार प्रेयसीने तिच्या प्रियकराला घरी भेटायला बोलावले होते. दोघेही घरात गप्पा मारत असताना अचानक प्रेयसीची काकू तिथे आली. तिला पाहून प्रेयसी घाबरली आणि प्रियकर सापडला जाऊ नये म्हणून तिने त्याला घरात असलेल्या एका मोठ्या लोखंडी पेटीत लपवले आणि बाहेरून कुलूप लावले.

प्रियकराला पेटीत कोंडले

काकूने तिला विचारले की आत कोण होते?, यावरून मुलीचे आपल्या काकूशी भांडण केले. त्यानंतर तिची आई आणि भाऊदेखील तिथे पोहोचले. घरच्यांनी त्या तरुणाला संपूर्ण खोलीत शोधले, पण तो सापडला नाही. त्याच वेळी त्यांना पेटीच्या आतून काहीतरी हालचाल झाल्याचा आवाज आला. मुलीने पेटीची चावी देण्यास नकार दिल्यावर घरच्यांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. कुलूप तुटत नसल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीकडून पेटीची चावी घेऊन कुलूप उघडले, तेव्हा आतून तिचा प्रियकर बाहेर आला. पोलिसांनी दोघांनाही चौकीत नेले.

दोघांची चौकशी सुरू

जेव्हा पेटीतून तरुण बाहेर आला, तेव्हा घरच्यांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला वाचवले. संतापलेल्या घरच्यांनी मुलीलाही पोलिसांच्या ताब्यात दिले आणि म्हणाले की, “हिलाही घेऊन जा आणि तुरुंगात टाका, कारवाई केल्याशिवाय दोघांना सोडू नका.” चकेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय प्रकाश मिश्र यांनी सांगितले की, मुलगा त्याच गल्लीत राहणारा असून त्याचे घर मुलीच्या घरापासून सात घरे सोडून आहे. सध्या दोघांची चौकशी सुरू असून चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

🤣कानपुर में बॉयफ्रेंड अपनी गर्लफ्रेंड से मिलने के लिए उसके घर पहुंचा। उसी वक्त GF के घर वाले आ गए। छिपाने के लिए GF ने BF को लोहे के बक्से में बंद कर दिया। बक्से से आहट हुई तो उसे खुलवाया गया, तब BF बाहर निकला। पुलिस ने हिरासत में लिया।🤣#UttarPradesh #Kanpur pic.twitter.com/Hg4656mPrz

— Aamir saifi (@Aamirsaifi100) January 24, 2026

दरम्यान, ही घटना चकेरी पोलीस स्टेशन परिसरात घडली. शुक्रवारी सकाळी मुलीचा मोठा भाऊ ट्रॅक्टर घेऊन शेतात निघून गेला, तर तिची आई एका कारखान्यात कामावर गेली होती. त्यानंतर मुलीने तिच्या प्रियकराला फोन करून घरी बोलावले होते. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता तिचा प्रियकर दुचाकीवरून तिच्या घरी आला. मात्र त्याचवेळी मुलीची काकू तिथे आल्याने हा सर्व प्रकार समोर आला आहे.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : पौर्णिमेच्या दिवशी करा काळ्या तिळाचा हा सोपा उपाय, शनिदोष होईल कायमचा दूर
  • T20 WC 2026 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेत जाणार, कारण की…
  • टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हे तीन मोठे विक्रम तोडणं कठीण, जाणून घ्या
  • जगाचं लक्ष वेधणारी बातमी! भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात, या लोकांना ‘अच्छे दिन’ येणार
  • ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये ‘महाभारत’ फेम अभिनेते साकारणार मिर्झा राजे जयसिंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in