• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video: पाकिस्तानविरुद्ध वैभव सूर्यवंशीचा आक्रमक बाणा, विकेट पडताच अंगावर धावत गेला; पण…

February 2, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीन खूपच महत्त्वाचा होता. त्यामुळे यात द्वंद्व होणार हे निश्चित होतं. नाणेफेक गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि पाकिस्तानच्या मनासारखं झालं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्व गडी गमवून 252 धावा केल्या. या धावा पाकिस्तानला 33-3 षटकात पूर्ण करायच्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानने सावध सुरुवात केली. पण त्यांचा डाव गडगडला आणि भारताने हा सामना 58 धावांनी जिंकला. हा सामना सुरू असताना वैभव सूर्यवंशीचा पारा चढल्याचं दिसून आलं. वैभव सूर्यवंशीने आपला सगळा राग पाकिस्तानी खेळाडूवर काढला. यावेळी भारतीय खेळाडूने त्याला रोखलं आणि पुढचा प्रकार टळला.

पाकिस्तानला 33.3 षटकात आव्हान गाठणं काही जमलं नाही. त्यामुळे भारताने सामना सुरू असताना उपांत्य फेरी गाठली आणि सामन्यावर पकडही मिळली. या सामन्याच्या 37व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उपकर्णधार विहान मल्होत्रान पाकिस्तानच्या अली हसन बलोचची विकेट काढली. पाकिस्तानची ही सहावी विकेट होती. त्यामुळे पाकिस्तानचा पराभवही निश्चित झाला होता. विहान या विकेटचा आनंद साजरा करत होता. तर दुसरीकडे, वैभव सूर्यवंशी रागाच्या भरात त्याच्या अंगावर चाल करून गेला. तेव्हा त्याला विहानने रोखलं. वैभव त्याला काही तरी बोलत होता. पण संघाच्या उपकर्णधाराने त्याला शांत केलं.

Vaibhav Suryavanshi owning them bhikaris pic.twitter.com/I7MyI40gsy

— Satyajeet Singh (@osatyao) February 1, 2026

वैभव सूर्यवंशीचा पारा चढण्याचा कारण तसं स्पष्ट नाही. भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना भिडणं काही नवीन नाही. भूतकाळात अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. अंडर 19 आशिया कप स्पर्धेत असं घडलं होतं. वैभव सूर्यवंशी फलंदाजी करत असताना उल जुलूल त्याला डिवचत होता. तर आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतही वैभव सूर्यवंशीला स्लेजिंगला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे वैभव सूर्यवंशीने सर्व राग एका सामन्यातच काढल्याचं बोललं जात आहे.

दुसरीकडे, भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 4 फेब्रुवारीला भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इलेक्ट्रिक किटली मध्ये फक्त चहा आणि कॉफीच नाही तर ‘हे’ पदार्थ देखील काही मिनिटांमध्ये होतात तयार
  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in