
आयपीएल 2026 स्पर्धेत क्रीडाप्रेमींची उत्कंठा वाढवणारा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डेविड मिलरने षटकार मारला आणि सामना पूर्णपणे दिल्लीच्या पारड्यात झुकला. पण पाचव्या चेंडूवर डेविड मिलरने धाव घेणं टाळलं आणि शेवटच्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळाल्याने सामना गमवावा लागला. हा सामना फक्त एका धावेने गुजरातच्या पारड्यात आला. या विजयापू्र्वी गुजरात टायटन्सच्या हातून काही चुका घडला. त्यामुळे कर्णधार शुबमन गिलला मात्र आशिष नेहराचे बोल ऐकावे लागले. हेड कोच आशिष नेहराने कर्णधार शुबमन गिलला त्या चुकांवरून झापलं. शुबमन गिलची चूक पाहून आशिष नेहराच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण ही चूक गुजरातला टायटन्सला महागात पडेल याचा अंदाज त्याला आला होती. नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात.
शुबमन गिलला एक थ्रोमुळे तिखट बोलणी खावी लागली. शुबमन गिलच्या एका थ्रोमुळे दिल्ली कॅपिटल्सला 1 धावेऐवजी पाच धावा मिळाल्या. शुबमन गिलने केलेला थ्रो स्टंपला लागला आणि चौकार गेला. ही चूक पाहून आशिष नेहरा संतापला आणि त्याने सामना सुरू असताना राग व्यक्त केला आहे. आशिष नेहराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शुबमन गिलला शिव्या पडल्या पण सामना जिंकल्याने जीव भांड्यात पडला. 16व्या षटकं अशोक शर्मा टाकत असताना हा प्रकार घडला.
— crictalk (@crictalk7) April 9, 2026
दिल्ली कॅपिटल्सच्या 15 षटकात 4 गडी गमवून 142 धावा झाल्या होत्या. तसेच 30 चेंडूत 69 धावांची गरज होती. 16वं षटक अशोक शर्माने टाकलं. या षटकात एकूण 16 धावा आल्या. यापैकी 4 धावा या ओव्हर थ्रोमुळे आल्या. ट्रिस्टन स्टब्सला अशोक शर्माने यॉर्कर टाकला होता. त्याने समोर कसा बसा मारला पण अशोक शर्मा काही पकडू शकला नाही. पण धावत येत गिलने चेंडू पकडला आणि स्ट्राईकच्या दिशेने जोरात फेकला. चेंडू स्टंपला लागला आणि दिशा बदलली. स्ट्राईकच्या दिशेने विकेटकीपर केएल राहुल धावत होता. केएल राहुल 86 धावांवर खेळत होता आणि त्याची विकेट मिळवण्यासाठी धडपड होती. पण तसं झालं नाही.
Leave a Reply