• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video: अजिंक्य रहाणेचा हा षटकार पाहिलात का? बॅट हातून सुटली आणि…

April 9, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेत 15व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला आणि कोलकात्याच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यात फिन एलनने पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारून चांगली सुरूवात केली. पण चौथ्या चेंडूवर विकेट गेली आणि संघावर दडपण वाढलं. पण कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली आणि डाव सावरला. संघावर दडपण असताना अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याने 24 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 41 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 170.83 चा होता. या खेळीतील एका षटकाराची चर्चा होत आहे. कारण हातातून बॅट सुटली आणि चेंडू सीमेपार गेला.

अजिंक्य रहाणेने षटकार मारला कसा?

लखनौ सुपर जायंट्सकडून नववं षटक टाकण्यासाठी आवेश खान आला होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर अजिंक्य राहणेने जोरदार प्रहार केला. पण असं करताना हातातून बॅट सुटली. त्यामुळे चेंडू फार लांब जाणार नाही असं वाटलं. पण बॅकवर्ड पॉइंटच्या वरून चेंडू थेट सीमेपार गेला. त्यामुळे अनोख्या षटकाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण की चेंडूवर योग्य रितीने प्रहार झाला नव्हता. अजिंक्य रहाणेचं नशीब चांगलं होतं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

𝘽𝙖𝙩 𝙜𝙤𝙣𝙚, 𝙗𝙖𝙡𝙡 𝙜𝙤𝙣𝙚 𝙩𝙤𝙤…😅

Ajinkya Rahane just proved that you don’t even need to be holding the bat to clear the ropes 🙌#TATAIPL 2026 | #KKRvLSG | LIVE NOW 👉 https://t.co/2ISFQDaiMT pic.twitter.com/EDttpB8Utl

— Star Sports (@StarSportsIndia) April 9, 2026

केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणेची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने 4 सामन्यात 124 धावांची खेळी केली आहे. अजिंक्यने मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात 67 धावांची खेळी केली होती. चार सामन्यातील धावांची गोळाबेरीज करता त्याचा स्ट्राईक रेट हा 155 चा आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : मोहरीच्या तेलाचा आणि तुरटीचा करा हा चमत्कारीक उपाय, तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही
  • इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय
  • Vastu Shastra : सुख समृद्धीसाठी करा हे 7 सोपे उपाय, आयुष्यात पुन्हा कधी आर्थिक संकट येणार नाही
  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?
  • Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in