• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Tips : वास्तुशास्त्रातील हे चार उपाय आहेत खूपच खास, गरिबी होईल झटक्यात दूर, घरात येईल सुख समृद्धी

March 7, 2026 by admin Leave a Comment


अनेकदा आपल्यासोबत असं होतं की, आपण प्रचंड पैसा कमावतो, परंतु तो आपल्या हातात टिकत नाही. घरात बरकत नसते. अचानक व्यवसायामध्ये मोठा तोटा होतो, किंवा काहीही कारण नसताना घरात वाद विवादाचे प्रसंगी निर्माण होतात. या सर्व गोष्टींसाठी आपण नशीबाला दोष देतो. मात्र हिंदू धर्मशास्त्रानुसार या साठी केवळ तुमचं नशीबच जबाबदार नसतं, तर त्यासाठी तुमच्या घरात निर्माण झालेले वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतात. आपलं कुटुंब नेहमी आनंदात राहावं, त्यांना कोणत्याही गोष्टींची कमी पडू नये, असा विचार आपण नेहमी करत असतो. त्यासाठी आपण प्रचंड कष्ट देखील करतो. मात्र अनेकदा आपल्याला त्या कष्टाचं इच्छित फळ प्राप्त होत नाही. असं का होतं? तर तुम्ही जे कष्ट करत आहात त्याला घरातील सकारात्मक ऊर्जेची जोड देखील आवश्यक असते. आणि जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा ऊर्जा संतुलन बिघडतं आणि त्याचा तुम्हाला फटका बसतो. यालाच वास्तुशास्त्राच्या भाषेत वास्तुदोष असं देखील म्हटलं जातं. आज आपण वास्तुदोष दूर करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

गंगा जल – वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये गंगा जल हे अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे. जर घरात गंगा जल असेल तर घरातील सर्व दोष दूर होतात असं मानलं जातं. तुम्ही जेव्हा दररोज सकाळी घराची साफ सफाई करता, स्वच्छता करता त्यानंतर घरात थोडं गंगा जल शिंपडण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घराला बरकत प्राप्त होते, तसेच जर समजा तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील त्या देखील दूर होतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

गायीला अन्न – हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे. तुम्ही जर नियमितपणे गो मातेची सेवा केली तर आयुष्यात तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे दारात आलेल्या गायीला कधीही उपाशीपोटी पुढे पाठवू नका, तिला चारा खाऊ घाला, यामुळे घराची प्रगती होते.

सुकलेली फुले – वास्तुशास्त्रानुसार घरात देवाला वाहिलेली फुले, जी दुसऱ्या दिवशी काढून टाकले जातात. ज्याला आपण निर्माल्य म्हणतो, असं निर्माल्य कधीही घरात ठेवू नका, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्र सांगतं.

जेवणाची दिशा – वास्तुशास्त्रानुसार जेवताना नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच तोंड करून जेवावं. यामुळे तुमच्या घरात कधीही अन्न धान्याची कमी राहात नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Girija Oak : ‘नॅशनल क्रश’च्या टॅगचा गिरिजा ओकला बसलाय मोठा फटका, तिच्यासोबत नेमकं घडतंय तरी काय?
  • Sharad Pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी; शरद पवार यांनी तुतारी फुंकली, आता थेट प्रहार? प्लॅनच सांगितला
  • tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात, सुळेंचे सूचक वक्तव्य चर्चेत
  • Monalisa Bhosale: मोनालिसा भोसलेच्या लग्नात मोठा ट्विस्ट, महिनाभरातच नवरा फरमान जाणार तुरुंगात?
  • Supriya Sule: अजितदादांचा फोन सापडला पण… सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in