• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या

April 9, 2026 by admin Leave a Comment


Vastu Tips : तुमच्या व्यक्तीगत तसचं कुटुंबाच्या प्रगतीमध्ये वास्तूची भूमिका खूप महत्वाची असते. तुम्ही पाहिलं असेल, नवीन घर खरेदी करताना अनेक जण आधी वास्तूची दिशा बघतात. कारण वास्तूच्या दिशेचा संबंध प्रगतीशी जोडलेला आहे. त्याशिवाय वास्तू शास्त्रानुसार घरात काही खास वस्तू आणून त्यांची ठराविक एक दिशेला मांडणी केली जाते. याचं कारण सकारात्मक ऊर्जा, पैसा, सुख, समृद्धी आहे. घराच्या प्रगतीसाठी अनेकदा वास्तू शास्त्र तज्ज्ञाचा सल्ला घेतला जातो. तुम्हाला माहितीय का वास्तू शास्त्रामध्ये एका मातीचं महत्व सांगितलं आहे.

या मातीला मुल्तानी माती म्हणतात. मुल्तानी माती म्हटल्यावर तुम्हाला सर्वप्रथम आठवेल चेहऱ्यावर येणारी चमक, सौंदर्य. कारण भारतात मुल्तानी मातीचा वापर चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो. पण आयुर्वेदासह वास्तू शास्त्रामध्ये मुल्तानी माती चमत्कारी मानली जाते. ही माती फक्त तुमच्या त्वचेचं सौदर्य वाढवत नाही तर मुल्तानी मातीमध्ये घराच्या वास्तूमधील नकारात्मक ऊर्जा सुकवून सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलण्याची ताकद असते.

घराच्या प्रवेशद्वारावर मातीचं भांड ठेवल्याने काय होईल?

मुल्तानी मातीमध्ये पृथ्वी तत्व मोठ्या प्रमाणात असतं असं वास्तू शास्त्रात म्हटलं आहे. जर, तुम्हाला असं वाटतय की विनाकारण घरात तणाव वाढतोय, भांडणं होतायत तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका मातीच्या भांड्यात मुल्तानी मातीचा छोटा तुकडा ठेवा. ही माती बाहेरुन येणाऱ्या वाईट शक्ती आणि निगेटिव वाइब्सना घरात प्रवेश करु देत नाही.

घरात धन टिकवून ठेवण्यासाठी काय करालं?

मेहनत केल्यानंतरही घरात पैसा टिकत नसेल, तर शुक्रवारी लाल कपड्यात मुल्तानी माती आणि एक चांदीचा शिक्का बांधून तिजोरी किंवा पैसा ठेवण्याच्या जागी ठेवा. असं म्हणतात ही मुल्तानी माती लक्ष्मी मातेला आवडते. यामुळे तुमच्या घरात धन टिकून रहायला मदत होते. ‘

ते पाणी घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडा

आठवड्यातून एकदा मुल्तानी माती पाण्यात मिसळून ते पाणी घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडा. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होईल. तिथे राहणाऱ्या लोकांचं मन शांत होईल. घरातील वास्तू दोष हळूहळू कमी होऊ लागतात.

नजर लागत नाही 

घरातील कुठल्या सदस्याला खासकरुन लहान मुलाला वारंवार नजर लागत असेल, तर मुल्तानी माती पाण्यात मिसळून त्याचा लेप त्यांच्या पायाच्या तळव्यांना लावा. त्यामुळे नजर लागत नाही.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
  • Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय
  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…
  • Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in