• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा घरात येईल गरिबी

March 6, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रामध्ये सायंकाळच्या वेळेला खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार सायंकाळची वेळ ही घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते. सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी मातेचं आगमन होणार असल्यानं या काळात काही विशिष्ट गोष्टी करू नये असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. सायंकाळच्या वेळी तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या नेहमी उघड्या ठेवाव्यात, तसेच सायंकाळच्या वेळी देवघरासमोर दिवा लावल्यानंतर न चुकता एक दिवा घराच्या मुख्य दरवाजासमोर देखील लावावा, त्यामुळे घरात सुख समृद्धी येते, घरातील वातावरण आनंदी राहतं असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र काही लोक सायंकाळच्या वेळी अशा काही चुका करतात ज्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते, लक्ष्मी मातेला धनाची देवता म्हटलं जातं. जर लक्ष्मी माता नाराज झाली तर घरात गरिबी येऊ शकते, त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, ज्या सायंकाळच्या वेळी करणं टाळलं पाहिजे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

भांडणं – सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येते असं मानलं जातं. त्यामुळे सायंकाळच्या वेळी घरात कधीही वादविवाद आणि भांडणं करू नये, अशी मान्यता आहे. जर सायंकाळच्या वेळी सतत भांडणं होत असतील तर यामुळे लक्ष्मी मातेची अवकृपा होते आणि घरात हळूहळू गरिबी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे घरात कधीही भांडणं करू नये असं मानलं जातं.

तुळशीचे पान तोडू नका – रात्रीच्या वेळी कधीही तुळशीचे पानं तोडू नयेत, तुळस हे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचं अतिशय प्रिय झाड आहे. ज्या घरात तुळस असते त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही. त्यामुळेच दररोज सकाळी तुळशीची पूजा करण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. पंरतु एक गोष्टीची काळजी नेहमी घेतली गेली पाहिजे की, कधीही रात्रीच्या वेळी तुळशीची पानं तोडू नयेत.

कोणालाही पैसे उधार देऊ नका – सायंकाळच्या वेळी कोणालाही पैसे देऊ नये, यामुळे घरावर लक्ष्मी मातेची अवकृपा होते असं मानलं जातं. त्यामुळे सायंकाळच्या वेळी कोणताही पैशांचा व्यवहार करू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सहलीला गेली अन् घात झाला, 15 वर्षांच्या मुलीचा दरीत सापडला मृतदेह, पालकांनो ‘या’ 5 चुका टाळा
  • लिंगपिसाट खरातचा एपस्टिन होणार? करुणा मुंडे यांच्या विधानाने खळबळ; काय केली मागणी?
  • Vaibhav Suraywanshi: वैभव सूर्यवंशीची तुफान खेळी पाहून विराट कोहलीही दंग! सामना संपल्यानंतर केले असे काही की…
  • टोयोटाचा धमाका! अवघ्या 40 महिन्यांत विकल्या गेल्या 2 लाख गाड्या, ‘या’ 7 सीटर कारने उडवली झोप, किंमत फक्त..
  • छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले, पायलटची मोठी चूक, हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड न करता…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in