• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : शनिवारच्या दिवशी करा हा सर्वात सोपा उपाय, सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून होईल तुमचं संरक्षण

March 16, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित असतो. शनिवार हा शनी देवाला समर्पित आहे. शनी देवांना न्यायाची देवता असं देखील म्हटलं जातं. शनी देव हे कर्मफळ दाता आहेत. म्हणजेच ज्याचं जसं कर्म तसं फळ शनी देव देत असतात. शनी देव यांना प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. जर एखाद्या व्यक्तीला शनीदोष असेल तर या उपायांमुळे त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात. तसेच शनिवारच्या दिवशी करण्याचे असे देखील काही उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमचं सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं. चला तर मग आज आपण या उपायांबद्दल माहिती जाणून घेऊयात.

शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय करावं? शनी देवांना न्यायाची देवता म्हटलं जातं, व्यक्तीचं जसं कर्म आहे, तसं फळ शनी देव देतात. म्हणून त्यांना कर्मफळ दाता असं देखील म्हटलं जातं. शनी दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच शनी देवांना प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी सकाळी उठून स्नान करावं, त्यानंतर शनी मंदिरात जाऊन शनी देवांचं दर्शन घ्यावं. शनी मंत्राचा जाप करावा. तसेच शनी देवांना काळे तीळ आणि तेल अर्पण करावं. या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावं, त्यांमुळे तुम्हाला शनी दोषातून मुक्ती मिळते.

दरम्यान अपाल्यासोबत अनेकदा असं होतं की आपण कोणतंही काम करायला गेलो तर त्या कामात आपल्याला यश मिळत नाही. अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं, किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टींची आपल्याला खूप भीती वाटू लागते. या सर्व गोष्टी तुमच्या घरात असलेल्या नकारात्मक शक्तींमुळे घडत असतात. अशा प्रकारची नकारात्माक शक्ती दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आप माहिती घेऊयात. शनिवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडं लिंबू पिळा, तसेच थोडी हळद मिक्स करा. या पाण्यानं अंघोळ केल्यास तुमचं सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होतं. असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in