• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : या पाच प्राण्यांच्या प्रतिमा घरात ठेवा, आयुष्यात कधीही पैसा कमी पडणार नाही

March 6, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये, तर घरात वास्तुदोष नेमका कोणत्या कारणांमुळे होतो? घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास काय अडचणी येऊ शकतात? तसेच वास्तुदोष दूर करण्यासाठी काय -काय उपाय केले पाहिजे? याबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार काही प्राण्यांना आणि पक्ष्यांना हे खूपच शुभ माण्यात आलं आहे. अशा प्राण्यांमुळे किंवा पक्ष्यांमुळे घरातील सर्व प्रकारची नकारत्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते आणि त्याचा तुमच्यावर खूपच चांगला प्रभाव पडतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. परंतु यात असे देखील काही प्राणी आहेत, ज्यांना आपण थेट पाळू शकत नाहीत. त्यामुळे अशा स्थितीमध्ये या प्राण्याची किंवा पक्ष्यांची मूर्ती किंवा प्रतिमा जरी घरात ठेवली तरी त्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडतो, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. चला तर मग आज आपण अशाच काही प्राण्यांबद्दल माहिती जाणून घेऊयात.

अ‍ॅक्वॅरियम – जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणी जाणवत असतील, व्यवसायामध्ये तोटा होत असेल तर घरात अ‍ॅक्वॅरियम किंवा माशांचं चित्र एखादं प्रतिक ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतील.

गाय – हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे, ज्या घरात गाय आहे, गो मातेची सेवा होते, त्या घरात कधीही पैशांना कमी नसते असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. मात्र अनेक जण गाय पाळू शकत नाहीत. अशावेळी गायीची मूर्ती घरात ठेवावी, विशेष: गाय आणि वासरू अशी दोघांची एकत्रित मूर्ती असेल तर उत्तमच असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

घोडा – घोड्याला शक्तीचं प्रतिक मानलं गेलं आहे, ज्या घरात आजारपण आहे. घरातील कोणता न कोणता सदस्य नेहमी आजारी असतो, आशा घरात जर घोड्याची प्रतिमा ठेवली तर सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात, त्या घरातील आजारपण दूर होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

उंट – उंट या प्राण्याला देखील खूप शुभ मानलं आहे, जर आपल्याला एखाद्या गोष्टी संदर्भात मार्ग सापडत नसेल, योग्य निर्णय घेता येत नसेल तर अशा स्थितीमध्ये घरात उंटाची प्रतिमा ठेवावी.

हत्ती – हत्तीला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. घरामध्ये जर हत्तीची मूर्ती असेल तर आर्थिक लाभ तर होतोच परंतु घराचं सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळ्यात काकडीचे सेवन म्हणजे आरोग्यासाठी वरदान, ‘या’ 4 पदार्थांसोबत खाल्ल्यास मिळेल दुप्पट फायदा
  • Gold Rate : आता सोनं खरेदी करणं अशक्य! 10 ग्रॅमचा भाव तब्बल….किंमत पाहून थक्क व्हाल!
  • आतापर्यंत एकही फ्लॉप चित्रपट न देणारा अभिनेता, लुकमुळे शाळेत सहन करायचा टोमणे
  • IPL 2026: वैभव सूर्यवंशी जाणीवपूर्वक करतोय दिग्गज गोलंदाजांना लक्ष्य! असं कारण तर नाही ना?
  • Photo : असीम मुनीरसोबत असणारी महिला कोण? संपूर्ण जगात का होतेय चर्चा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in