• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : पौर्णिमेच्या दिवशी करा काळ्या तिळाचा हा सोपा उपाय, शनिदोष होईल कायमचा दूर

February 2, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रानुसार नकळत आपल्या हातून काही चुका होतात, त्यामुळे घरात वास्तुदोष, शनिदोष सारखे दोष निर्माण होतात. जेव्हा घरात असे दोष निर्माण होतात, तेव्हा त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा केवळ तुमच्यावरच होत नाही, तर तुमच्या संपूर्ण घरादारावर होतो. जेव्हा घरात शनिदोष निर्माण होतो, तेव्हा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, अचानक धनहानी होते, काहीही कारण नसताना घरात वादविवाद होतात, शनिदोष नेमका कशामुळे निर्माण होतो तर त्यासाठी अनेक कारण आहेत, जसं की पश्चिम दिशा ही शनिदेवाची दिशा आहे, ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवली गेली पाहिजे,जर या दिशेला काही अडचण असेल किंवा ही दिशा अस्वच्छ असेल तरी घरात शनिदोष निर्माण होतो, तसेच शनिवारच्या दिवशी लोखंड किंवा मीठ खरेदी करू नये, त्यामुळे देखील घरात शनिदोष निर्माण होतो, आज आपण काळ्या तिळाशी संबंधित काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातील शनिदोष दूर होऊन, तुमच्यावर शनिदेवाची कृपा होईल.

वास्तुशास्त्रानुसार दर महिन्याच्या पौर्णिमेला जर पाण्यात काळे तीळ घालून त्या पाण्याने अंघोळ केल्यास शनिदेवांची कृपादृष्टी प्राप्त होते, तसेच घरातील सर्व वास्तुदोष देखील दूर होतात. शनिदोषही नाहीसा होतो. एवढंच नाही तर पौर्णिमेच्या दिवशी तिळाच्या पाण्यानं अंघोळ केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते असं देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

जसं आपण पौर्णिमेला तिळाच्या पाण्यानं अंघोळ करतो तसंच जर एखाद्या घरात शनिदोष असेल किंवा एखाद्या व्यक्तीला शनिपिडा असेल तर अशा व्यक्तीने दररोज अंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ घालून जर त्या पाण्यानं अंघोळ केली तर शनिदेव प्रसन्न होतात, शनिदोष नष्ट होतो. एवढंच नाही तर अचानक येणारे सर्व प्रकारचे संकट देखील टळतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

जर तुम्हाला शनिदोष असेल तर दर शनिवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करा, त्यानंतर शनि मंदिरात जाऊन शनिदेवांचं दर्शन करा, शनिदेवांना तेल तसेच काळे तीळ अर्पण करा, यामुळे देखील शनिदोष दूर होतो. ज्या व्यक्तींना शनिदेवांची साडेसाती आहे, अशा व्यक्तीने दररोज हनुमानाचं दर्शन करावं, त्यामुळे देखील शनिदोष दूर होतो. तसेच दररोज सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा व पिंपळाला प्रदक्षिणा घालाव्यात, यामुळे घरातील सर्व दोष दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मंगळवारी संपूर्ण भारतात काम बंद, गिग कामगारांची सर्वात मोठी घोषणा, काय-काय बंद राहणार?
  • सारखं सारखं ओटी पोटामध्ये दुखणं ‘या’ आजाराचा संकेत, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
  • ऑफिसचा वर्कलोडमुळे तणाव वाढतोय? ‘हे’ सोपे टिप्स करा फॉलो….
  • India vs Pakistan: तरच टीम इंडिया विरुद्ध खेळणार! पाकिस्तानची अट काय? जाणून घ्या
  • WPL 2026 Eliminator : दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, यूपी रोखणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in