• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : पाकिटात पैसा टिकत नाही? मग वास्तुशास्त्रात सांगितलेले हे उपाय एकदा करून पहाच…

March 22, 2026 by admin Leave a Comment


अनेकांच्या बाबतीत असं होतं की, जेवढी कमाई असते त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो. त्यामुळे पाकिटात पैसा टिकत नाही. वास्तुशास्त्रामध्ये याचा संबंध वास्तुदोषासोबत जोडला गेला आहे. अनेकदा आपण नकळत आपल्या पाकिटात अशा गोष्टी ठेवतो, ज्या गोष्टी आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा ठरतात. या वस्तूंमुळे धनाचा ओघ कमी होतो. अनेक जण फाटलेलं जुनं पाकिट वापरतात. वास्तुशास्त्रानुसार कधीही फाटलेलं पाकिट वापरू नये. त्यामुळे धनहानी होते. जो पैसा तुमच्याकडे येणार आहे, तो येत नाही. तुमच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. जर तुमच्याही पाकिटात पैसा टिकत नसेल तुम्हालाही आर्थिक समस्या जाणवत असतील तर ही समस्या दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणू घेणार आहोत. या उपायांमुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील आणि तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील.

पाकिटात या वस्तू ठेवू नका

अनेक लोकांना आपल्या पाकिटामध्ये गरज नसलेल्या वस्तू दोखील ठेवण्याची सवय असते. जसं की अनेक जण आपल्या पाकिटात जुने बिलं, पावत्या, आणि फाटलेल्या नोटा ठेवतात. मात्र वास्तुशास्त्रामध्ये हे अशुभ माण्यात आलं आहे. पाकिटामध्ये कधीही जुनी बिलं, पावत्या किंवा फाटलेल्या नोटा ठेवू नये, त्यामुळे अनपेक्षित खर्च वाढतो, आणि तुमच्या पाकिटामध्ये पैसा टिकत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जर तुमच्याही पाकिटात या वस्तू असतील तर आजच त्या पाकिटातून काढून टाका, तसेच जर तुमचं पाकिट फाटलेलं असेल तर ते देखील बदलण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

पाकिटाचा रंग

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या पाकिटाचा रंग कसा आहे? याचा परिणाम देखील तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो. वास्तुशास्त्रानुसार काळं, निळं किंवा एखाद्या खूप गडद रंगाचं पाकिट असेल तर ते तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करतं. तुमच्या पाकिटात पैसा टिकत नाही. त्यामुळे कधीही काळ्या, निळ्या किंवा एखादं अतिशय गडद रंगाचं पाकीट वापरू नका, त्याऐवजी क्रीम कलरच, किंवा राखाडी पाकीट तुम्ही वापरू शकता, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

देवी देवतांचे फोटो

अनेकजण आपल्या पाकिटामध्ये देवी -देवतांचे फोटो जसं की लक्ष्मी माता, कुबेर यांचे फोटो ठेवतात. मात्र वास्तुशास्त्रात ही गोष्ट अशुभ माण्यात आली आहे. त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा येतो. पाकिटामध्ये कधीही देवी, देवतेचा फोटो असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यावेजी तुम्ही पाकिटात एखादा छोटा मोर पीस ठेवू शकतात. त्यामुळे तुमची आर्थिक प्रगती होण्यास मदत होते.

पाकिटात ठेवा ही छोटी वस्तू

वास्तुशास्त्रामध्ये आर्थिक प्रगतीसाठी एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तो म्हणजे एका छोट्या पिवळ्या वस्त्रामध्ये थोडेसे तांदूळ घ्या, थोडी हळद घ्या. त्यांचं मिश्रण करा. त्यानंतर हे मिश्रण एका वस्त्रामध्ये व्यवस्थित बांधून आपल्या पाकिटात ठेवा. त्यामुळे सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होऊन, तुमच्या पाकिटात पैसा टिकेल असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in